`नास्तिक असूनही मुस्लिम असणं माझी मजबुरी`; जावेद अख्तर यांनी सांगितलं हिंदू न होण्याचं कारण...
Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी या सगळ्या गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Javed Akhtar : लोकप्रिय कवी आणि लेखक असलेल्या जावेद अख्तर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. जावेद अख्तर हे सगळेच सण साजरे करतात. सगळ्या धर्मांवर विश्वासही ठेवतात. त्यांचं म्हणणं आहे की ते नास्तिक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्म माणणारे काही लोक ट्रोल करतात. इतकंच नाही तर मुस्लिम एक्सट्रीमिस्टनं त्यांचं नाव अमर ठेवलं आहे. तर हिंदू त्यांना जिहादी बोलतात. इच्छा असूनही त्यांचा धर्म का बदलू शकत नाही याविषयी जावेद अख्तर यांनी सांगितलं आहे.
जावेद अख्तर यांनी मोजो स्टोरीसाठी बरखा दत्तसोबत अनेक चर्चा केल्या. बरखानं जावेद यांना विचारलं की सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करतात ही खूप साधारण गोष्ट आहे. सगळ्यात मजेशीर गोष्ट त्यांनी कोणती ऐकली आहे याविषयी विचारलं? यावर उत्तर देत जावेद अख्तर म्हणाले, "मी नास्तिक असतानाही, मला जिहादी म्हटलं. मला तर अशा लोकांपासून वाचून राहण्यासाठी 3-4 वेळा पोलिस संरक्षण देण्यात आलं. हा मूर्खपणा आहे. लोकं सोशल मीडियावर कोणालाही शिवीगाळ करण्यासाठी मिळणाऱ्या स्वातंत्र्याची मज्जा घेतात. त्या गोष्टीला इतकं महत्त्व द्यायचं नसतं. मला तर दोन्ही बाजूनं शिवीगाळ होतो. काही मुस्लिमांनी तर माझं नाव बदललं. अमर नाव दिलं. हिंदू एक्सट्रीमिस्ट बोलतात. पाकिस्तानला जा. जेव्हा दोघांपैकी एक ट्रोल करणं थांबवतं तेव्हा चिंता वाढते. जेव्हा दोन्ही बाजुचे लोक ट्रोल करतात तोपर्यंत सगळं ठीक आहे. "
नास्तिक आहेत जावेद अख्तर
जावेद अख्तर यांनी सांगितलं की "मी मुस्लिम नास्तिक आहे. धर्माला मानत नाही. मी मुस्लिम कुटुंबात जन्माला आलो आहे. माझ्याकडे मुस्लिम राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, कारण त्यासाठी मला धर्म बदलावा लागेल. पण मी कोणत्या धर्माला मानत नाही, तर मी का जाऊ. मी मुस्लिम धर्मातील मतांनां मानत नसलो तरीही मी मुस्लिमच आहे. "
हेही वाचा : 'जे 420 करतात ते 400 जागा जिंकणार'; निवडणुकांची घोषणा होताच पुन्हा बोलले प्रकाश राज
पुढे याविषयी सांगत जावेद अख्तर म्हणाले की "अनेक लोक नास्तिक आहेत, ते फक्त समाजाकडून असलेल्या प्रेशरमुळे हे स्वीकारू शकत नाही. त्यांची अवस्था अशी आहे जशी 60 वर्षांपूर्वी गे लोकांची होती. लोक समाजामुळे हे मान्य करत नव्हते. मी आणि शबाना सगळे सण साजरे करतो. होळी-दिवाळी सगळे सण. धर्मांमध्ये ते सण आहेत जेणेकरुन सगळ्यांना त्याचं आकर्षण राहिल."