Javed Akhtar French Girlfriend: बॉलिवूडमध्ये जितके लोकप्रिय चित्रपट आहेत. त्यापैंकी असे अनेक चित्रपट आहेत. ज्यात सलीम-जावेद यांचे नाव घेतल्याशिवाय हे चित्रपट अजिबातच पुर्ण झालेले नाहीत. त्यांमुळे त्यांचे चित्रपटांचे आपण सगळेच जण फॅन्स आहोत. जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तितकीच चर्चा रंगलेली असते. सध्या जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीतून आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शबाना आझमी यांच्याशी लग्न होण्यापुर्वी ते एका फ्रेंच मुलीच्या प्रेमात पडले होते. ते आपल्या या खास मैत्रीणीला भेटायला जायचे आणि कधी ती तिला भेटायला ययाची. तुम्हाला माहितीये का की त्यांनी तिला लग्नासाठी प्रपोजही केले होते. 


यावेळी बिग बॉस ओटीटी 2 स्पर्धक सायरसशी बोलताना ते म्हणाले, 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा करण्यासाठी मी राजेश खन्ना यांच्या सेटवर गेलो होतो. तिथे मला एक फ्रेंच मुलगी जोसॅन भेटली होती. काही दिवसानंतर मी 'अंदाज' या चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो. तिथे मी तिला परत भेटलो होतो. काही दिवसानंतर आमची मैत्री झाली. तिनं मला सांगितले की ती तिच्या मैत्रिणींसोबत ताज हॉटेलच्या मागे राहते. मी तिला भेटायला जायचो. त्यानंतर माझ्या आणि तिच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. कधी ती माझ्याकडे येयाची तर कधी मी तिच्याकडे जायचो. 


त्यानंतर जावेद अख्तर म्हणाले की, त्यावेळी ताज ते बांद्रापर्यंतचे टॅक्सीचे भाडे हे 14 रूपये होते. तेव्हा तेवढे पैसे खूप जास्त होते. एखाद दिवशी मला हे कळून चुकले होते की मी माझ्याकडचे सर्व पैसे संपवून बसणार आहे तेव्हा मग मी तिच्याकडे गेलो आणि मग मी तिला सांगितलं की माझ्याशी लग्न कर किंवा मग परत निघून जा. तेव्हा ती मला म्हणाली की माझ्याकडे पैसे नाहीत पण मला परत जायचे आहे. मग मी तिला असं म्हणालो की तू काळजी करू नका मी ते सांभाळेन. तेव्हा मी तिच्यासाठी सर्व पैसे खर्च केले आणि मी तिच्यासाठी तिकिट काढलं व ती निघून गेली. त्यानंतर तिनं मला तेव्हा पत्र लिहिले होते पण मी तिला उत्तर देऊ शकलो नाही. ते पत्र हरवलं आणि तिच्याशी संपर्कही करण्याचा कुठला मार्ग उरला नाही. ती संधी गेली. 


38 वर्षांनी पुन्हा भेट झाली


काळा घोडा फेस्टिवलसाठी जावेद अख्तर आपल्या पत्नीसोबत गेले होते. तेव्हा त्यांना मागून कोणीतरी हाक मारली होती. अशातच त्यांना जौसेन भेटली होती. त्यावेळी तिनं त्यांना सांगितले की ती पॅरिसमध्ये आहे आणि तिला तीन मुलं आहेत. तेव्हा त्यांना तिनं तोच बोर्डिंग पास दिला ज्यानं ती पॅरिसला परत गेली होती.