मुंबई : १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. अभिनेता जावेद जाफरीने पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ एक ट्विट केलं होतं. त्याने केलेल्या या ट्विटमुळे त्याच्यावर मोठी टीका करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद जाफरीने ट्विटमध्ये म्हटलं की, 'जैश-ए-मोहम्मह' या धार्मिक नावाखाली अशा प्रकारची दहशतवादी संघटना चालवण्यात येणं ही अतिशय शरमेची बाब आहे. इस्माल धर्माच्या नावाखाली अशाप्रकारचं अमानवीय, दुष्कृत्य करणं लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अशा संघटनांना सरकार किंवा काही धार्मिक संस्था पाठिंबा देत असतील त्यांचा निषेध करतो' अशा शब्दांत जावेद जाफरीने विधान केलं होतं. परंतु त्याच्या या विधानावर नेटकऱ्यांकडून त्याच्यावर मोठी टीका करण्यात येत आहे. 




त्याच्यावर होणाऱ्या टीकेनंतर त्याने ट्विटबदद्ल जाहीर माफीही मागितली आहे. जावेदने ट्विट करत माझ्या ट्विटमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी माफी मागत असल्याचं त्याने म्हटलंय. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. जावेद जाफरीने दिलेल्या पुलवामा हल्ल्याच्या विधानामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली. परंतु जावेदने अशाप्रकारे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असणं देशविरोधी नसल्याचं त्याने म्हटलंय. मी लोकशाहीवर विश्वास ठेवतो. सर्वांना त्यांची मतं मांडण्याचा हक्क असल्याचंही त्यांन म्हटलंय.