Jawan box office collection day 11 : मागील कित्येक दशकांपासून भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यानं पुन्हा एकदा त्याच्या अभिनयानं चाहत्यांना गारद केलं आहे. 'जवान' या चित्रपटाच्या माध्यमातून किंग खान काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पाहता पाहता पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. चित्रपटानं दुसऱ्या विकेंडला विक्रमी 100 कोटींची कमाई केली आणि चित्रपट विश्लेषकांपासून समीक्षक आणि इतर सेलिब्रिटीही हैराण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 57 व्या वर्षी शाहरुखप्रती चाहत्यांच्या मनात असणारं प्रेम कमी झालेलं नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी म्हणजेच रविवारी हिंडी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित झालेल्या Jawan नं भारतात 477.28 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला. 400 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये अतिशय कमी वेळातच प्रवेश करणारा Jawan हा पहिला चित्रपट ठरला असून आता त्याची वाटचाल 500 कोटी रुपयांच्या कलेक्शनच्या दिशेनं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याचा सुट्ट्यांचा माहोल आणि एकंदर वातावरण पाहता हा टप्पाही चित्रपट लगेचच गाठेल यात शंका नाही. 


बॉलिवूड चित्रपटाचा दाक्षिणात्य तडका... 


शाहरुखची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'जवान' या चित्रपटाचं दिग्दर्शन अटलीनं केलं असून, परदेशातही या चित्रपटानं कमाईच्या विक्रमांना गवसणी घातली आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटानं  $104 million  म्हणजेच जवळपास 860 कोटी रुपयांची दांडगी कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या या यशानंतर आता एकाच वर्षात दोन चित्रपटांनी 100 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडल्यामुळं शाहरुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


हेसुद्धा वाचा : Ganesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र 'त्या' कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा


 


आता स्पर्धा 'पठान'शी 


बॉक्स ऑफिसवरील जवळपास सर्वच विक्रम शाहरुखच्या 'जवान'नं मोडले असून आता स्वत:च्याच 'पठान' या चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर किंग खान निघाला आहे. त्याच्या 'पठान' या चित्रपटाच्या हिंदी वर्जननं 524 कोटी रुपयांची कमाई केली होती. तेव्हा आता शाहरुखचा नवा चित्रपट त्याच्या हिंदी वर्जनच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांची कमाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.