Jawan Box Office Collection Day 2 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा जवान हा चित्रपट परवा प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटानं पहिल्या दिवशी चांगली कमाई केली असली तरी देखील या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया शाहरुख खानच्या जवाननं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, जवान चित्रपटानं दुसऱ्या दिवशी फक्त 53 कोटींची कमाई केली. त्यानंतर शाहरुखच्या जवाननं भारतात बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 125 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं दोन दिवसात तब्बल 127.50 कोटींची कमाई केली आहे. जवानच्या कमाई विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं पहिल्या दिवशी 74.5 कोटींची कमाई केली होती. त्यात 65.5 कोटी ही हिंदी भाषेतील चित्रपटातून कमावले होते. तर तमिळ भाषेत चित्रपटानं 5.3 कोटी आणि तेलगू भाषेत चित्रपटानं 3.7 कोटींची कमाई केली. तर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त मदत हिंदीनं केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दुसरीकडे शाहरुखच्या जवान या चित्रपटाला IMDb वर 8.4 रेटिंग्स मिळाले आहेत. जवान प्रदर्शित होताच 'गदर 2' आणि 'ड्रिम गर्ल 2' या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट झाली आहे. पण जवान चित्रपटानं दुसऱ्या दिवशी झालेल्या कमाईच्या घटनं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. कारण शाहरुखचा पठाण या चित्रपटान बॉक्स ऑफिसवर प्रत्येक दिवशी वाढ झाली होती. तर इथे जवानकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असताना त्याच्या कमाईत घट झाली आहे. 


हेही वाचा : किंग खानच्या 'जवान'साठी माधुरीनं शेअर केली खास पोस्ट, म्हणते 'पुन्हा एकदा...'


या चित्रपटात शाहरुखसोबत महत्त्वाच्या भूमिकेत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.