Jawan Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची प्रेक्षकांवर असलेली क्रेझ कमी होताना दिसत नाही आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटानं रविवारी सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई केली. या चित्रपटानं कलेक्शनच्या कमाईत अनेक रेकॉर्ड बनवले असले. तर आता जवानच्या विकडेज बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते. रविवारच्या तुलनेत सोमवारी या चित्रपटाच्या कमाईत खूप घट झाली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 58.90 टक्के पडला आहे. तर जवाननं सहाव्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खान 'जवान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग केली होती. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई केली होती. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी आणि पाचव्या दिवशी 32.92 कोटींची कमाई केली. चित्रपटानं पाचव्याच दिवशी 300 कोटींचा आकडा पार केला. 


हेही वाचा : Welcome 3 मध्ये दिसणार नाही उदय शेट्टी; नाना म्हणाले- ‘अब हम पुराने हो गए!'


दरम्यान, शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत. ज्यात शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सैकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, जवानच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 26.50 कोटींची कमाई केली. त्यानंतर शाहरुखच्या जवाननं सहा दिवसात 345.58 कोटींची कमाी केल्याचे समोर आले. 


शाहरुख खानच्या ‘जवान’ ची क्रेझ फक्त भारतात नाही तर पदरेशात देखील आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी सनी देओलच्या 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडू शकली नाही. 'गदर 2' नं सहाव्या दिवशी कलेक्शनमध्ये 32.37 कोटींची कमाई केली होती तर त्याच्या तुलनेत ‘जवान’ नं 26.50 कोटींची कमाई केली. शाहरुखच्या पठाण या चित्रपटानं देखील सहाव्या दिवशी 26.5 कोटींची कमाई केली होती. जवाननं सहाव्या दिवशी 345.58 कोटींची कमाई करत 'पठाण'ला मागे टाकले आहे. 'पठाण' या चित्रपटानं 307.25 कोटींची कमाी केली होती. 


'जवान' या चित्रपटात शाहरुखचा डबल रोल पाहायला मिळत आहे. या चित्रपटातं खूप मोठी कास्ट पाहायला मिळत आहे. तर गौरी खाननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.