लग्नाच्या विधींमध्ये वधु आणि वराच्या हातात नारळ का देतात? कारण जाणून घ्याच

लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्न म्हटलं की मोठे सोहळे आलेच. अशावेळी लग्नाचे विधी करत असताना आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. लग्नाच वधु-वरांच्या हातात नारळ का असतो? याचे कारण जाणून घ्या. 

| Dec 17, 2024, 17:15 PM IST

Why Do Indian Brides Carry A Coconut: लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्न म्हटलं की मोठे सोहळे आलेच. अशावेळी लग्नाचे विधी करत असताना आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. लग्नाच वधु-वरांच्या हातात नारळ का असतो? याचे कारण जाणून घ्या. 

1/7

लग्नाच्या विधींमध्ये वधु आणि वराच्या हातात नारळ का देतात? कारण जाणून घ्याच

why do indian brides and groom carry a coconut know the  significant reason

तुम्ही लग्नात वधु-वरांच्या हातात नारळ पाहिला असेल. पण लग्नात हा नारळ का पकडतात हे माहितीये का? हिंदू धर्मात नारळाचे विशेष महत्त्व आहे. पुजा आणि कार्यक्रमात नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळ हा लक्ष्मीस्वरुप मानले जाते. नारळाशिवाय पुजा आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जाते.    

2/7

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वधु आणि वर नारळ का पकडतात? याचे महत्त्व आणि मान्यता काय आहेत जाणून घ्या. लग्नात वधु आणि वरांच्या हातात नारळ देणे ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

3/7

 अनेक जण तो नारळ छान मोती व हिऱ्यांनी सजवून देतात. नारळ हे श्रीफळ म्हणून वापरले जाते. काही लग्नांमध्ये वधु आणि वर यांचा नारळाची देवाणघेवाण करतात. 

4/7

 काही ठिकाणी साखरपुड्याच्या दिवशी पुजलेला नारळच लग्नाच्या दिवशी वधु-वरांच्या हातात दिला जातो. तर, काही ठिकाणी लग्नासाठी नवीन नारळाची पुजा करुन हातात दिला जातो. 

5/7

 शास्त्रांनुसार, वधु आणि वरांच्या हातात नारळ देण्याची मान्यता आहे की, नारळ हा फर्टिलिटी, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. 

6/7

नारळ पकडण्याबाबत असंही सांगण्यात आलं आहे की, नारळाच्या मदतीने सर्व देवी-देवता वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. 

7/7

लग्नात वधुच्या हातात नारळ देण्याचा अर्थ तिच्या पुढील आयुष्यांसाठी आशीर्वाद देणे हा आहे.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)