Jawan Box Office Collection Day 7: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. या चित्रपटानं अल्पावधीच फार मोठी कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पुर्ण झाला आहे. समोर आलेल्या आकड्यांनूसार, देशभरात या चित्रपटानं कालपर्यंत 368 कोटी रूपये कमावले आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट लवकरच 400 कोटीच्या क्लबमध्ये येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. या चित्रपटाची चर्चाही जोरात रंगली होती. त्यातून यावर्षी शाहरूख खानचा हा दुसरा सिनेमा आहे. जो बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गाजलेला चित्रपट आहे. यावर्षी जानेवारीत आलेल्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर आता 500 कोटींच्या घरात घौडदौड करणारा हा शाहरूखचा एकाच वर्षातला दुसरा सिनेमा आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटानं चांगलीच ओपनिंग केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन एक दिवसांत मात्र हा चित्रपट हवीतशी कामगिरीत करत नव्हता. परंतु बऱ्याच चढउतारानंतर आता हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये जातो आहे. अटली कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं जगभरात 600 कोटी रूपयांच्या वर कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं 74.50 कोटी रूपयांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटानं 129.06 कोटी रूपयांची कमाई केली आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, 23.53 टक्के थिएटरमधील जागा या 'जवान'साठी भरलेल्या होत्या.


गदर 2 ला टक्कर 


ऑगस्ट महिन्यात 'गदर 2' हा चित्रपट 500 कोटींच्याही पुढे गेला होता. त्यामुळे या चित्रपटाची तुफान चर्चा सुरू होती. त्यातच आता चर्चा आहे ती म्हणजे जवानची. 'गदर 2' ला टक्कर द्यायला सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची जोरात चर्चा रंगलेली होती. 'जवान' हा चित्रपट अटली कुमरा यांनी दिग्दर्शित केला आहे. शाहरूख खानसोबत नयनतारा ही अभिनेत्री झळकली होती. त्यांच्या रोमान्सची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी आता चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले हिची. शाहरूख खानच्या चित्रपट ही मराठमोळी अभिनेत्री झळकली आहे. 


आता येत्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट नक्की किती चांगली घौडदौड करतो, हेही पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यातून यावेळी याचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.