Jawan Box Office Collection: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतो आहे. फार कमी कालावधीतच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आता हा चित्रपट अल्पवधीतच 700 कोटींच्या पार जाईल आणि 'पठाण'चाही विक्रम मोडले अशी जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. यावर्षी शाहरूखच्या या चित्रपटानं सगळ्याचाच विक्रम मोडला होता. त्यामुळे आता त्याच्याहीपुढे जाऊन 'पठाण'पेक्षा 'जवान' हा चित्रपट विक्रमी कमाई करेल याचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. कालच्या आकाडेवारीनुसार, असे दिसते की 'जवान' हा चित्रपट देशभरात लवकरच चांगली कमाई करेल त्याचसोबत जगभरात हा चित्रपट 700 कोटी रूपये कमावू शकेल. त्यामुळे सध्या जवान कधी एकदा हा विक्रम मोडतोय याची सर्वांनाच चर्चा रंगलेली आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की यावेळी कशाप्रकारे जवान बॉक्स ऑफिसवर कमाई करतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यावेळी शाहरूख खान आणि नयनतारा यांचा रोमान्स पाहायला मिळतो आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा रंगलेली आहे. अटली कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावरही आता या चित्रपटाच्या निमित्तानं या चित्रपटातील शाहरूख खानची फॅशन, त्याचसोबत त्याचे डायलॉग्स, डान्स, गाणी याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून यंदाही हा चित्रपट पाहण्यासाठी लोकं गर्दी करताना दिसत आहेत. त्यातून शाहरूख खानच्या या चित्रपटामुळे त्यांच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 


हेही वाचा : वहिनीच्या सौंदर्यापुढे ऐश्वर्याही फिकी! कमनीय बांधा अन् बोल्डनेस पाहून भलेभले पडले गार


समोर आलेल्या आकाड्यांनूसार, जवान या चित्रपटानं काल 386 कोटी रूपये देशभरात कमावले आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 75 कोटी रूपये कमावले होते. या चित्रपटासाठी भारतात चांगली ऑक्युपन्सी पाहायला मिळाली. सोबतच हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित झाला आहे. आत्तापर्यंत जवाननं जगभरातून 660 कोटी रूपये कमावले आहेत. रेड चिलीस एन्टरटेंनमेंटनुसार, हा आकडा 80 मिलियन डॉलरमध्ये जातो. त्यामुळे आता या शनिवारपर्यंत हा चित्रपट 100 मिलियन डॉलर्स आणखीन कमावेल याचाही चर्चा रंगलेली आहे. असं करत करत हा चित्रपट 700 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


'पठाण'लाही टक्कर?


'पठाण'नं 1000 कोटी जगभरात कमावले होते. त्यातून ही विक्रमी कमाई करायला त्याला फार वेळही लागला होता. परंतु जवान मात्र एवघ्या सात दिवसातच करतो आहे.