`जवान`ला ऑस्करसाठी पाठवणार; संकेत देत दिग्दर्शक म्हणाला, शाहरुखसोबत...
Jawan For Oscars: जवान चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात शो हाऊसफुल्ल देखील झाले आहेत.
Jawan For Oscars: शाहरुख खानचा जवान तुफान हिट होत आहे. चित्रपटातील कलाकारांसोबतच दिग्दर्शक अॅटलीचे कौतुक होत आहे. दिग्दर्शक अॅटलीने दहा वर्षांच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत फक्त सात चित्रपट केले आहेत. अॅटलीचे हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. जवान ही त्याचा सातवा चित्रपट आहे. अवघ्या 11 दिवसांतच जवानने देशभरात 477.63 कोटींची कमाई केली आहे. तर, जगभरात 860.30 कोटींचा आकडा गाठला आहे. जवान चित्रपट रोजच्या रोज नवनवीन रेकॉर्ड करत असतानाच आता दिग्दर्शक अॅटलीने जवान चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी ते शाहरुखसोबतही बोलणं करणार आहे.
जवान चित्रपटात शाहरुख खान डबल रोड करणार आहे. चित्रपटात विक्रम सिंह राठौड आणि आझाद या दोन्ही भूमिका त्यांने उत्तमरित्या साकारल्या आहेत. जवान हिट झाल्यानंतर आता चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्याचीही चर्चा आहे. अॅटली चांगल्या कथेच्या शोधात असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यातच आता जवान ऑस्करसाठी पाठवणार असल्याचं अॅटलीने म्हटलं आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अॅटलीला सिनेमा ऑस्करला पाठवणार का? असा प्रश्न विचारला असता. त्याने लगेचच यावर उत्तर दिलं आहे. जर सगळं काही ठिक असेल तर जवानलादेखील ऑस्करमध्ये पाठवलं पाहिजे. सिनेमात काम करणाऱ्या दिग्दर्शक ते टेक्निशियनपासून सगळ्यांची नजर गोल्डन ग्लोब्स, ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कारांसह प्रत्येक पुरस्कारावर आहे. त्यामुळं जवानला ऑस्करपर्यंत घेऊन जाणे मला आवडेल. मी खान सरांनाही फोन करुन विचारणार आहे. सर आपल्याला या चित्रपटासाठी ऑस्कर मिळायला हवा का?, असं अॅटलीने म्हटलं आहे.
2020पासून सोबत काम करताहेत शाहरुख आणि अॅटली
दिग्दर्शक अॅटलीने शाहरुख खानला जवानची कथी 2020मध्ये ऐकवली होती. तेव्हा शाहरुख आणि गौरी दोघांनाही कथा आवडली होती. अॅटलीने शाहरुखला झूम कॉलवर चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली होती. त्यानंतर 5-10 मिनिटांतच शाहरुख चित्रपट करायला तयार झाला होता.
शाहरुख खान पहिल्या दिवसांपासून त्याच्यासोबत जवानवर काम करत होता. त्यानी स्क्रिप्टवरही थोडे काम केले होते. त्यांनी चित्रपटात अनेक बदलही सुनावले होते. तसेच सल्लेदेखील दिले होते.