Jawan Twitter Review : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट आज 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेनं प्रेक्षक करत असताना आज हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं सगळ्यांचा आनंद गगनात मावेना असा झाला आहे. भारतात अनेक ठिकाणी जवान पाहण्यासाठी प्रेक्षक सकाळी 5 वाजता असलेला शो पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच त्याची जबरदस्त बूकिंग झाली होती. आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी तुफान कमाई करणार असल्याचे समोर आले आहे. आता अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच पूर्वीचे ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. चला जाणून घेऊया प्रेक्षक काय म्हणत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'जवान' या चित्रपटाच्या रिअॅक्शन विषयी सांगितलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'जवान' या चित्रपटाची चर्चा सुरु होती. चित्रपटा संबंधीत सगळेच हॅशटॅग टॉप रॅंकिंग करत होते. पण आता जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा प्रेक्षक काय बोलत आहेत हे जाणून घेऊया... एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'जवान ब्लॉकबस्टर आहे. अॅटलीनं दर्जेदार चित्रपट दिला आहे. त्यासोबत इमोशन्स खूप मस्त आणि अॅक्शन पॅक चित्रपट आहे. हे वर्ष बादशाचं आहे. पाहायला विसरू नका जवान. तर या व्यक्तीनं चित्रपटाला पाच स्टार्स देखील दिले आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'जवान ब्लॉकबस्ट आहे. अॅटलीनं खूप चांगला चित्रपट बनवला आहे. उत्तम ड्रामा आणि उत्तम अभिनय ते अॅक्शनही. हे वर्ष शाहरुख खानचं आहे. विजय सेतुपती, दीपिका पदुकोन आणि नयनतारा या तिघांनी खूप चांगलं काम केलं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला शाहरुखच्या जवानचं स्वागत.'




एका नेटकऱ्यानं 'जवान' चित्रपट पाहत असताना थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत 'जवान' पाहताना त्याच्यावर फुलांनी स्वागत करत असल्याचे पाहायला मिळते. दुसरा नेटकरी म्हणाला, 'सेलिब्रेशन सुरु झालं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जवान हा अप्रतिम चित्रपट आहे. शाहरुख खाननं सुंदर अभिनय केला आहे.'




दरम्यान, शाहरुख खानसोबत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.