सूनेबद्दल जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य ऐकून ऐश्वर्याला अश्रू अनावर
ऐश्वर्याबद्दलचं हे मत ऐकून तिलाच अश्रू अनावर झाले आहेत. ती अनेकदा जया यांच्यासोबत दिसते. आता पुन्हा एकदा बच्चन कुटूंब चर्चेत आल्याचं आपल्याला दिसतं आहे. पण यावेळी या चर्चेच कारण ऐश्वर्या आणि जया बच्चन आहेत
मुंबई : ऐश्वर्या राय ही बच्चन कुटूंबाची एकुलती एक लाडकी सून आहे. ऐश्वर्याचं अभिषेकसोबतच नव्हेतर अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबतही खूप छान बॉण्डिंग आहे. अनेकदा ऐश्वर्या तिच्या सासू सासऱ्यांसोबत स्पॉट होत असते. कधी ती तिच्या फॅमिलीसोबत रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट होते तर कधी ती विमानतळावर तिच्या कुटूंबासोबत दिसते तर कधी ती तिच्या फॅमेलीसोबत कार्यक्रमांमध्ये दिसते. पापराझींनी या कुटूंबाला एकत्र स्पॉट करताच बच्चन कुटूंब लगेच चर्चेतही येतं. कायम ऐश्वर्या आणि बच्चन कुटूंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत हे असतंच. आता पुन्हा एकदा बच्चन कुटूंब चर्चेत आल्याचं आपल्याला दिसतं आहे. पण यावेळी या चर्चेच कारण ऐश्वर्या आणि जया बच्चन आहेत.
असं म्हटलं जातंय की, जया बच्चन यांनी ऐश्वर्याला सगळ्यांसमोर असं काही म्हटलंय ज्यामुळे ती रडू लागली. तर चला पाहूया सासू सुन नेमकी कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. एकदा एकदा फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये स्वत: जया यांनी सून ऐश्वर्याचं कौतुक केलं होतं. या दोघी एका अवॉर्ड शोवेली पोहचल्या होत्या. यावेळी जया यांनी ऐश्वर्याबद्दल बोलताना सांगितलं की, ऐश्वर्या खूप आदर्श सून आहे. त्यांच्या नजरेत ऐश्वर्यापेक्षा चांगली मुलगी कोणीच नाही. ऐश्वर्या ही सर्वात गोड मुलगी आहे.
ती माझी मैत्रीण आहे. मला तिच्याबद्दल काही आवडत नसेल तर मी तिच्या समोर ते बोलून दाखवते. मी तिच्या मागे राजकारण करत नाही. जर ती माझ्याशी असहमत असेल तर ती तिचा दृष्टिकोन सांगते. फरक एवढाच आहे की मी जरा जास्त ड्रामेटिक असू शकते. आणि तिला जरा जास्त प्रतिसाद द्यावा लागतो. मी म्हातारी आहे, तुम्हाला माहिती आहे. आम्ही घरी बसून बकवास बोलण्यात एन्जॉय करतो. फक्त आम्हा दोघींकडेही जास्त वेळ नसतो, पण ती जे काही करते, त्यात मी आनंदी आहे, माझे तिच्याशी खूप चांगले संबंध आहेत.''ऐश्वर्याबद्दलचं हे कौतुक ऐकून ऐश्वर्याला अश्रू अनावर झाले. आणि ऐश्वर्या सगळ्यांसमोरच ढसा-ढसा रडू लागली.
याआधीही अनेकदा जया यांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. ऐवढंच नव्हेतर अमिताभ यांनीही ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. लग्नानंतर ऐश्वर्याने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. ऐश्वर्या आणि अभिषेकला आराध्या नावाची गोड मुलगी आहे. आराध्या आणि ऐश्वर्या अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. ऐश्वर्या सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. सोशल मीडियावर ऐश्वर्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तर दुसरीकडे आराध्याही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.