मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे असभ्य वर्तन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पापाराझींसोबत त्यांचे वागणे कोणालाच आवडत नाही. याच कारणामुळे त्या सोशल मीडियावरही टार्गेट झाल्या असल्या तरी तिला काही फरक पडत नाही. कारण पुन्हा एकदा त्यांनी असे काही बोलून दाखवले आहे की, ते ऐकून सगळ्यांना धक्काबसला आहे. ही गोष्ट त्यांची नात नव्या नवेली (Navya Naveli Nanda) नंदा हिच्याशी संबंधित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया बच्चन यांनी नव्या नवेली नंदाच्या रिलेशनशिप आणि लग्नाबद्दल चर्चा केली. यादरम्यान त्या म्हणाले की, नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी फिजिकल अट्रॅक्शन खूप महत्त्वाचे असते. 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya) या पॉडकास्टवर आपली नात नव्या नवेली नंदासोबत बोलताना जया म्हणाल्या की, 'आम्ही आमच्या काळात प्रयोग करू शकलो नाही.' त्या म्हणाल्या की, नात्यात शारीरिक पैलू खूप महत्त्वाचा असतो. 'प्रेम, फ्रेश हवा आणि एडजेस्टमेंट' यावर नाते टिकू शकत नाही. नव्या नवेली नंदाला 'विवाहाशिवाय मूल' झाल्यास यावर जया बच्चन यांची काही हरकत नसेल असे त्यांनी सांगितले आहे.


जया बच्चन म्हणाल्या, 'लोक माझ्या बोलण्यावर आक्षेप घेतील, पण शारीरिक आकर्षण आणि कम्पॅटिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. आमच्या काळात एक्सपेरिमेंट करता येत नव्हते, पण आजची पिढी करते आणि का करायला नको? कारण त्यावर रिलेशनशिप अवलंबून असते. जर शारीरिक संबंध नसेल तर ते फार काळ टिकत नाही. मला असं वाटतं की आपण प्रेम आणि फ्रेश हवा आणि एडजेस्टमेंट यावर टिकू शकत नाही.'



तरुण पिढीला आणि नात नव्याला सल्ला देत जया म्हणाल्या, 'मला वाटतं तू तुझ्या जिवलग मित्राशी लग्न कर. तुझ्या जवळ एक चांगला मित्र असला पाहिजे. तुम्ही चर्चा करायला हवं, 'कदाचित मला तुझ्यासोबत मूल हवं आहे, कारण मला तू आवडतोस. मला वाटतं की तू चांगला आहेस. तर लग्न करूया, कारण समाज असंच म्हणतो. लग्न न करताही तुला मूल झालं तरी माझी काही हरकत नाही. मला खरोखर काही अडचण नाही.' (Jaya Bachchan Does Not Have Problem If Navya Naveli Nanda Choses To Have Child Without Marriage Read What She Said) 


जया बच्चन यांची रागाची बाजू सर्वांनाच माहीत आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांत त्या पापाराझींवर अनेकदा रागावल्या. दिवाळीच्या मुहूर्तावरही त्यांनी फोटोग्राफर्सना सोडले नाही आणि त्यांच्यावर ओरडताना दिसल्या. यामुळे त्या सोशल मीडियावर या कारणामुळे चर्चेत राहिल्या.