पहिल्या नजरेतच अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या जया बच्चन
जया बच्चन-अमिताभ बच्चन यांची प्रेमकथा एखाद्या सिनेमाच्या कथे पोक्षा कमी नाही...
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक तर प्रत्येक वेळा होत असतं. बॉलिवूडमध्ये त्यांनी कठोर मेहनत घेत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुरूवातीच्या काळात त्यांचे सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास असर्मथ ठरले. पण ते खचले नाही. त्यांनी मागे वळून कधीही पाहिलं नाही. तेव्हा त्यांची साथ दिली जया बच्चन यांनी. दोघांच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. फक्त एक सहकलाकार म्हणून नाही तर उत्तम जोडीदार म्हणून देखील त्यांची चर्चा होते.
जया बच्चन कायम पती अमिताभ बच्चन यांच्या सुखः, दुःखात सहभागी झाल्या. दुःखात परिस्थितीवर मात मिळवली, तर सुखात आनंद साजरा केला. जेव्हा बिग बींनी बॉलिवूडमध्ये पाय ठेवला तेव्हा त्यांना सलग 12 वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मुंबई सोडून जावी असा विचार देखील त्यांच्या डोक्यात आला. तेव्हा बिग बींना साथ मिळाली ती जया बच्चन यांची.
जेव्हा सगळ्या अभिनेत्रींनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी नकार दिला तेव्हा मात्र त्यांची साथ दिली जया बच्चन यांनी. जया बच्चन यांनी कधीच बिग बींची साथ सोडली नाही. दोघांची ओळख पुण्यात झाली. जेव्हा पुण्यात जया शिकण्यासाठी गेल्या, तेव्हा बिग बींचा खडतर प्रवास सुरूचं होता. अमिताभ बच्चन यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
शरीरिराने बारीक असल्यामुळे त्यांना काडी म्हणून चिडवायचे. तेव्हा जया यांना राग यायचा. बिग बींसाठी त्या मैत्रिणींसोबत देखील भांडल्या. बिग बी एक महत्त्वाची सांगितली ती म्हणजे त्यांनी जया बच्चन यांना पहिल्यांदा मासिकाच्या कव्हर पेजवर पाहिलं आणि त्यांना त्यांची 'ड्रीम गर्ल' भेटली.
कसं झालं जया - अमिताभ यांचं लग्न
दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम होतं. त्यानंतर भेटी वाढल्या. मैत्रीचं रूपांतर प्रेमाच झालं. त्यांच्या 'जंजीर' सिनेमाला भरभरून यश मिळालं. सिनेमाच्या यशाचं सेलिब्रेशन त्यांना लंडनमध्ये कारायचं होतं. पण बिग बींच्या वडिलांचा हट्ट होता की लग्न झाल्याशिवाय बाहेर गावी जायचं नाही. तेव्हा 1973 साली अभिताभ आणि जया यांनी लग्न केलं.