Jaya Bachchan on Agstya Nanda: अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा पुढच्या वर्षी द आर्चिज या झोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करतो आहे. लवकरच या चित्रपटाची रिलिज डेट जाहीर होईल. या चित्रपटातून अगस्त्या नंदासोबत शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, जान्हवी कपूरची बहीण आणि श्रीदेवी-बोनी कपूरची धाकटी लेक खुशी कपूरही दिसणार आहे. हा चित्रपटातून एकाचवेळी तीन स्टारकीड्स पदार्पण करत असल्यानं प्रेक्षकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. परंतु या चित्रपटाला रिलिज झाल्यावर प्रेक्षक कसे स्विकारतील हा येणारा काळच ठरवेल. (jaya bachchan opens up on agstya nanda why he sees k3g movie multiple times)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या नातवाबद्दल खुद्द जया बच्चन यांनीच एक धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या जया बच्चन आपल्या नातीच्या म्हणजे नव्या नंदाच्या इन्टाग्राम पोडकास्टमध्ये सहभागी होत आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका पोडकास्टमध्ये जया बच्चननं आपल्या नातवाच्या एका सवयीबद्दल सांगितले आहे. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


What the Hell Navya नावाचा पोडकास्ट जया बच्चन यांची नातं नव्या नंदा इन्टाग्रामवर चालवते. या पोडकास्टमध्ये जया बच्चन आणि नव्याची आई श्वेता बच्चन यांनी सहभाग दर्शवला होता. या एपिसोडमध्ये नव्यानं श्वेता आणि जया यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांच्या लिस्टबद्दल विचारलं तेव्हा दोघींनी आपापल्या पद्धतीनं आपल्या आवडत्या चित्रपटांची लिस्ट नव्याला सांगितली. तेव्हा जया म्हणाल्या की मला जुने चित्रपट पाहायला आवडतात. खासकरून 'गॉन विथ द विंड', 'ऑन द वॉटरफ्रंट', आणि 'पॉल न्यूमन्स कॅट ऑन अ हॉट टिन रूफ' हे माझे आवडते चित्रपट आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जया बच्चन असंही म्हणाल्या की, भारतीय जुन्या चित्रपटांना मी नेहमीच प्राधान्य देते. मला तो काळ आजही आवडतो. फार जुने चित्रपट मी पाहते. दिलीप कुमार यांचा देवदास, मुघल - ए - आझम हे चित्रपट मी बऱ्याचदा पाहते. मला सर्वात जास्त आवडतो तो कभी खुशी कभी गम. हा चित्रपट मी नेहमीच पाहते. 


आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का


या चित्रपटाबद्दल बोलताना श्वेता बच्चन म्हणाल्या की  K3G हा चित्रपट माझा मुलगा अगस्त्या वारंवार पाहतो. पण अमिताभ बच्चन यांचे चित्रपट तो कधीच पाहत नाही कारण ते त्याला कळतंच नाहीत. असं श्वेता गंमतीनं म्हणाल्या परंतु तेवढ्यात श्वेताला अडवत जया बच्चन म्हणाल्या की, अगस्त्या माझी मस्करी करण्यासाठी K3G वारंवार पाहतो, असं म्हणत त्यांनी अगस्त्याची गंमत केली.