मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) गेल्या काही दिवसांपासून तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. नव्या सध्या तिची आजी जया बच्चन (Jaya Bachchan), आई श्वेता बच्चन (Shweta Bachchan) यांच्यासोबत 'व्हॉट द हेल नव्या' नावाचा पॉडकास्ट करते. यादरम्यान नव्या अनेक विषयांवर बोलत असते. आता यावेळी नव्या पिरियड्सबद्दल (Periods) बोलली. नव्यानं पहिल्यांदा तिच्या आईला तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल विचारले. यावर श्वेता म्हणाली, 'मी फक्त बेडवर पडून चॉकलेट खायचे. घरात एकटं रहायसा आवडायचे. यानंतर, नव्यानं तिची आजी जया बच्चन यांना प्रश्न विचारला विशेषत: जेव्हा त्या चित्रपटांमध्ये काम करायच्या तेव्हा कसा अनुभव होता त्या विषयी विचारले. खूप वाईट आणि विचित्र परिस्थिती होती. 


काय म्हणाल्या जया बच्चन -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया पुढे म्हणाल्या, 'आम्ही आउटडोर शूटिंग करायचो तेव्हा आमच्याकडे व्हॅनिटी व्हॅन नव्हती. झुडपांच्या मागे कपडे बदलायचो. तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन जाव्या लागत होत्या जेणेकरून तुम्ही त्यात सर्व काही टाकू शकाल आणि एक बास्केट देखील. त्यानंतर त्या बास्केटला घरी घेऊन जायचो आणि नंतर फेकून द्यायचो. जया नव्याला म्हणाल्या की आम्ही 4-5 सॅनिटरी टॉवेल सोबत ठेवायचो.


हेही वाचा : अक्षय कुमारला का मागावी लागली चाहत्यांची माफी, जाणून घ्या


नव्यानंतर म्हणाली की पीरियड्सबद्दल लोक कसे विनोद म्हणून घेतात ते सांगते. नव्या म्हणाली की लोक मासिक पाळीसाठी कोड वर्ड वापरत म्हणतात की मला पी होत आहे. याचा अर्थ तुम्ही मासिक पाळीला मासिक पाळी का बोलू शकत नाही. हे ऐकताच तिची आई श्वेता बच्चन हसू लागते. (jaya bachchan shweta bachchan shared their first period experience in navya naveli nanda podcast) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नव्याचा हा पॉडकास्ट दर शनिवारी येतो. जया यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्या शेवटची 'की एंड का' चित्रपटात दिसल्या होती. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जया यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. आता जया बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या भूमिका असलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात त्या दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.