मुंबई : बच्चन कुटुंबाला पुन्हा एकदा संकटाने घेरलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि त्यांची मुलगी आराध्या यांच्या नंतर आता अभिनेत्री जया बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह अल्यामुळे त्यांच्या कामांना देखील ब्रेक लागला आहे. जया बच्चन सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ब्रेक घेतला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमामध्ये जया बच्चन यांच्या शिवाय अभिनेत्री शबाना आजमी आणि अभिनेते धर्मेंद्र देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 



मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचे शूटिंग शेड्यूल 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार होते आणि 14 फेब्रुवारीला संपणार होते. पण काही दिवसांपूर्वी शबाना आझमी आणि आता जया बच्चन यांना कोरोना झाल्यानंतर करण जोहरने शेड्यूल रद्द केले आहे.