मुख्यमंत्र्यांना जया बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा
तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई : गेल्या एक महिन्यापसून राज्यात सत्ता संघर्षाचा पेच कायम होता. परंतु गुरूवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री आहेत. काल शिवतिर्थावर मोठ्या थाटात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक दिग्गज नेते त्याचबरोबर कलाकार देखील उपस्थित होते. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वी अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
'ठाकरे आणि बच्चन कुटुंबामध्ये खूप दृढ संबंध आहेत. उद्धव ठाकरे मंत्री पदाचा पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.' अशा प्रकारे जया बच्चन यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर वाटचास करेल, तर शेकऱ्यांना दिलासा आणि युवकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा देखील त्यांनी याठिकणी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे आणि बच्चन कुटुंबामध्ये जवळचे संबंध आहेत.