मुंबई : एकेकाळी टीव्ही जगतातील प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतील कलाकार जया भट्टाचार्य सध्या आर्थिक विवंचनेत आहे. स्मृती इराणीसह काम करणारी अभिनेत्री जयाने पायल ही भूमिका साकारली होती. हे पात्र अनेकांच्या पसंतीस उतरले होते. सध्या अभिनेत्री जया कामाच्या शोधात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट सांगितली. यादरम्यान आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याचे दु:खही त्यांनी व्यक्त केले. त्यांची ७९ वर्षीय आई २६ नोव्हेंबरपासून रुग्णालयात आहे. त्यांना हृदयासंबंधित आजार आहे. मूळची आसामची असणारी जया गेल्या अनेक काळापासून टीव्हीपासून दूर आहे. कलर्स वाहिनीवरील प्यार की थपकी या मालिकेत त्या अखेरच्या दिसल्या होत्या.


टीव्ही सीरियलव्यतिरिक्त त्यांनी काही सिनेमांमधूनही काम केलेय. गेल्या दोन दशकांपासून या क्षेत्रात काम करतायत. त्यांनी कसम से, केसर, हातिम, क्योंकि सांस भी कभी बहू थी या मालिकांतून काम केलेय.