मुंबई : टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटला छोट्या पडद्यावरील टॉप अभिनेत्री म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. जेनिफर ही टीव्हीचा लोकप्रिय चेहरा आहे. जो अनेक हिट मालिकांमध्ये दिसला आहे. जेनिफरची जादू केवळ टीव्हीवरच नाही तर ओटीटीवरही चालली आहे. ती कोड एम वेब सीरिजमधून खूप चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या व्यावसायिक आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या जेनिफरने आता तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरेच काही खुलासे केले आहेत. विशेषत: करण सिंग ग्रोव्हरसोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर ज्या वेदनातून गेली होती ती आता जेनिफरच्या जिभेवर आली आहे.


घटस्फोटावर जेनिफर उघडपणे बोलली
अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या वैयक्तिक आयुष्यावर फार कमी बोलते, पण यावेळी या अभिनेत्रीने तिच्या आयुष्याचे अनेक मुद्यांवरुन पडदा उचलला आहे. विशेषत: घटस्फोटानंतर तिला झालेल्या वेदना तिने शब्दात मांडल्या आहेत. जेनिफरने सांगितलं की, जेव्हा तिने करण सिंह ग्रोवरपासून घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागले होते.


तिने हा निर्णय बदलावा अशी प्रत्येकाची इच्छा होती. जेनिफर म्हणाली, 'त्यावेळी प्रत्येक व्यक्ती असं वागत होता की, तू वेडी झाली आहेस, तू असं का करतेस'. पण जेनिफरच्या म्हणण्यानुसार तिने हा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी देवसुद्धा तिला तो निर्णय बदलू शकला नाही.


घटस्फोटानंतर घरातून जाणही केलं होतं बंद 
घटस्फोटापूर्वीच नाही तर घटस्फोटानंतरही जेनिफरसाठी सगळं काही इतकं सोपं नव्हतं. लोकांकडून मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे तिला घराबाहेर पडणं बंद केलं होतं. लोकं तिच्याशी ज्या प्रकारे वागत होते याबद्दल तिला वाईट वाटत नव्हतं पण तिला हे सर्व नको होतं.


तिला ते आवडलं नाही म्हणून तिने बराच वेळ स्वतःला घरात कोंडून घेतलं आणि बाहेर जाणे बंद केलं. मात्र, आता जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हरच्या घटस्फोटाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनीही आपापल्या आयुष्यात प्रगती केली आहे.