मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा आतापर्यंतचा सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आणि दया-जेठालाल ही जोडी सर्वांना आवडते. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना नेहमीच हसवलं आहे. दिशा वाकानी आता बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसत नाही. पण आजही ही जोडी खूप पसंत केली जाते. आज आम्ही तुमच्यासमोर या कपलचा रोमँटिक डान्स व्हिडिओ घेऊन आलो आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थ्रोबॅक व्हिडिओमध्ये दया बेनचा वेगळा अंदाज 
समोर आलेल्या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये, दोघींना शोमध्ये डान्स परफॉर्मन्ससाठी रिहर्सल करताना पाहिलं जाऊ शकतं. दोघंही शाहरुख खानच्या 'एक दिन आप हमको मिल जाएंगे' या रोमँटिक गाण्यावर कपल डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर धुमाकूळ घालत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव 
हा व्हिडिओ पाहून 'तारक मेहता' शोचे चाहते खूप भावूक झाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये ते दया बेनला शोमध्ये परत येण्याचं आवाहन करत आहेत. त्याचबरोबर काहीजण हार्ट, फायर इमोजी शेअर करुन आपली प्रतिक्रीया देत आहेत.