मुंबई : छोट्या स्क्रिनवरील सर्वात प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चष्मा जवळपास 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे,  त्यातील प्रत्येक पात्राबद्दल सर्वांना माहिती आहे. सर्वांनी घराघरात आपली छाप पाडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांत या शोची काही पात्रे बदलली आहेत, पण आजही अशी अनेक पात्रे आहेत जी वर्षानुवर्षे या शोचा भाग आहेत आणि यातील मुख्य पात्र म्हणजे दिलीप जोशी हे आहेत. गेल्या 13 वर्षांपासून जेठालाल बनून ते लोकांचे मनोरंजन करत आहे.


बबिता जी आणि जेठालाचे पात्र लोकांना खूप आवडतात आणि चाहत्यांना पॉइंट आणि गंमत या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. बबिताला इंप्रेस करण्यासाठी जेठालाल सर्व प्रयत्न करतात. खऱ्या आयुष्यात जेठालाल खरंच इतके रोमँटिक आहेत का? 



जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी यांनी पत्नी जयमाला यांच्यासोबत व्यतित केलेल्या खास क्षणांबद्दल  सांगितलं आहे. जेठालाल एकदा पत्नीसोबत रिव्हर क्रूझवर गेले होते. थेम्स नदीवरची ही क्रूझ डेट आजही दिलीप जोशींच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. 


रिव्हर क्रूझ डेटमध्ये त्यांनी इटालियन तसेच लेबनीज फूडचा आस्वाद घेतल्याचे  दिलीप जोशी यांनी सांगितलं. ते अनेकदा सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी  लंडनला जातात.