मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. जेव्हाही त्या कोणती पोस्ट टाकतात ती पोस्ट लगेच व्हायरल होते. अनेक मुद्द्यांवर मत मांडणाऱ्या स्मृती इराणी कधी-कधी मजेशीर पोस्ट टाकत असतात. सध्या त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या संबंधित आहे. व्हिडिओत मालिकेतील प्रसिद्ध पात्र जेठालाल (Jethalal) फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसतंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स हसून हसून लोटपोट झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मृती इराणी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या मीममध्ये अभिनेता दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल कोणाला तरी कॉल करताना दिसत आहेत. समोरची व्यक्ती फोन उचलत नसल्याने जेठालाल ओरडून सांगत होता - 'फोन उठा, फोन क्यों नहीं उठा रहा है?' त्याचबरोबर व्हिडिओवर कॅप्शन लिहिले आहे की, 'When an overworked MONDAYcalls the next SUNDAY.' हा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय 'खरं सांगितलंय (Enough said)'


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओला 97 हजार नेटिझन्सनी पाहिला असून हा आकडा वाढत आहे. तसेच त्यावर कमेंट्सचा पाऊसही पडतोय. नेटिझन्स मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ पाहतायत आणि त्याचा आनंद घेतायत. बहुतेक नेटिझन्सनी कमेंट करण्यासाठी इमोजीचा वापर केलाय.