Jhalak Dikhhla Jaa 10 च्या स्पर्धकांच नेटवर्थ माहितीय का? जाणून घ्या
रूबीना दिलीक पासून शिल्पा शिंदे पर्यंत...`झलक दिखला जा`चे स्पर्धक आहे इतक्या कोटीच्या संपत्तीचे मालक
मुंबई : पाच वर्षांनंतर टीव्हीवरचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' परतला आहे. हा शो 3 सप्टेंबरपासून टीव्हीवर प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे. रुबिना दिलीक, धीरज धूपर, निया शर्मा, अमृता खानविलकर, पारस कालनावत यांसारखे दमदार सेलिब्रिटी या शोचा एक भाग राहिले आहेत. आज आम्ही तुम्हाला 'झलक दिखला जा 10' च्या या स्पर्धकांच्या नेटवर्थबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊय़ात.
निया शर्मा
अभिनेत्री निया शर्मा मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील आहे. तिची एकूण संपत्ती 55-60 कोटी रुपये आहे. निया शर्मा तिच्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते. झलकमध्ये निया शर्मा चांगला परफॉर्मन्स देत आहे.
रुबिना दिलीक
रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' ची ट्रॉफी रुबिना दिलीकने जिंकली होती. रुबिना दिलीक आता 'झलक दिखला जा 10' मध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. रुबिना दिलीकची एकूण संपत्ती 29-32 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. रुबिना दिलीक ही रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसणार आहे.
नीती टेलर
'कै ये यारियां' फेम नीती टेलरही या सीझनमध्ये दिसणार आहे. पार्थ समथानसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती 7 ते10 कोटी रुपये आहे.
शिल्पा शिंदे
बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदेही या डान्स रिअॅलिटी शोमध्ये डान्स करताना दिसणार आहे. तिची एकूण संपत्ती 14-20 कोटी आहे. सोशल मीडियावर शिल्पा शिंदे तिच्या फॅन्ससोबत रिहर्सलच्या काही झलक शेअर करत आहे.
गश्मीर महाजनी
मराठी अभिनेता आणि लोकप्रिय टीव्ही स्टार गश्मीर महाजनी देखील शोमध्ये आपल्या डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना प्रभावित करताना दिसणार आहे. त्याची एकूण संपत्ती 30-35 कोटी रुपये आहे.
अमृता खानविलकर
टीव्ही फेम आणि 'मलंग' स्टार अमृता खानविलकरची एकूण संपत्ती 3-6 कोटी रुपये आहे. अमृता रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'चा भागही आहे. ही अभिनेत्री फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 मध्ये देखील दिसली होती.
पारस कालनावत
'अनुपमा' या शोमधून प्रसिद्ध अभिनेता पारस कालनावत प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यांची एकूण संपत्ती 10-30 कोटी आहे. पारस 'समर' मालिकेतही दिसला होता. पारस कालनावतने 'अनुपमा' सोडून 'झलक दिखला जा' साइन केले.