Actress Dolly Sohi Quits Show : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री डॉली सोहीनं तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं. डॉलीनं मालिकेत साइड रोल साकारल्या असतील, पण ती तिच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी ओळखली जाते. डॉली सोहीन सध्या 'झनक' या सीरिजमध्ये दिसत होती. शोमध तिची भूमिका खूप खास होती. मात्र, अचानक तिनं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तिनं नवीन प्रोजेक्ट मिळाला म्हणून किंवा कुठे बाहेर जाणार आहे म्हणून किंवा काही आनंदानं घेतलेला नसून तिनं एका मोठ्या कारणामुळे घेतला आहे. हा निर्णय तिनं मजबुरीनं घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झनक' सोडण्या विषयी बोलायचे झाले तर डॉली सोहीला कॅन्सरचे निदान झाले आहे. अशात कर्करोगावर उपचार करण्यासाठी डॉलीनं ही मालिका सोडली. डॉली सोहीला सर्वाइकल कॅन्सर आहे. कामामुळे तिनं यावर नंतर उपचार करेन असा विचार केला होता. मात्र, तिनं मालिका मध्येच सोडत उपचार करण्याचा निर्णय घेतला. या विषयी बोलताना डॉली सोहीनं सांगितलं की 'मला मालिका सोडावी लागली, कारण मला कीमोथेरेपीसाठी जावं लागतं होतं. तर आता रोज होणाऱ्या रेडिएशनमुळे मला अशक्तपणा आला आहे. यामुळे मी शूटिंग देखील करू शकत नाही.'



कर्करोगवर बोली डॉली सोहील


कर्करोगाचे निदान होण्यावर डॉली सोहीनं तिच्यात असलेली सकारात्मकता वाढवण्यावर वक्तव्य केलं. तिनं एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये डॉलीनं म्हटलं की 'तुम्ही परत जाऊन सुरुवात जशी होती ते बदलू शकत नाही. पण जिथे तुम्ही तुमचा अंत सुरु झाला, तिथे तुम्ही त्यात बदल करून नवीन सुरुवात करू शकता.' दरम्यान, डॉलीची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. 



हेही वाचा : जेव्हा नशेत तर्र्रर जॅकी श्रॉफ तब्बूच्या जवळ आला..., त्यानंतर कधीच दिसली नाही त्यांची जोडी


डॉली सोहीच्या करिअर सुरुवातीविषयी बोलायचे झाले तर तिनं 'भाभी', 'कुमकुम भाग्य' आणि 'परिणीति' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, आता झनक या मालिकेत डॉली सोहीची जागा आता अभिनेत्री पूर्वा गोखले घेणार आहे.