मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या चाहत्यांच प्रेम आपण गेले तीन दिवस पाहत आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 72 तासानंतर श्रीदेवीचा मृतदेह भारतात आणण्यात आलं. मुंबई एअरपोर्टपासूनच श्रीदेवीच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. श्रीदेवीची एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर होते. पोलिसांनी या अगोदरही चाहत्यांचा वेडेपणा पाहिला असेल त्यामुळे त्यांना या गोष्टीचा अंदाज होता. मुंबई एअरपोर्टवरून श्रीदेवीच्या वर्सोवात असलेल्या ग्रीन एकड्सपर्यंत मार्ग बदलला. 


दोन्ही मुलींनी घेतली आईकडे धाव


पोलिसांनी श्रीदेवीच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली आहे. तसेच आता श्रीदेवीच्या घराजवळील ग्रीन एकड्समध्ये अनेक कलाकार सहभागी होत आहे. अशावेळी श्रीदेवीच्या दोन्ही मुली आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या. आपल्याला माहितच आहे जान्हवी कपूर आपला आगामी सिनेमा धडकसाठी करण जोहरसोबत शूट करत होती. त्यामुळे ती दुबईच्या लग्नासाठी उपस्थित राहू शकली नाही. मात्र या घटनेनंतर करण जोहर जान्हवीला अनिल कपूरच्या घरी घेऊन आला. 


या घटनेनंतर जान्हवी आणि खुशी दोघीही पुन्हा आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या. दोघींनी देखील दुबईला धाव घेतली. 54 वर्षाच्या श्रीदेवींचा असा अकस्मात मृत्यू साऱ्यांनाच चटका लावणारा आहे. गेली 50 वर्षे सिनसृष्टीच्या माध्यमातून श्रीदेवी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 


अनिल अंबानींनी दुबईला पाठवलं जेट 


बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार,  श्रीदेवीचं पार्थिव दुबईतून भारतात आणण्यासाठी अनिल अंबानी यांनी रविवारी आपलं प्रायव्हेट जेट पाठवलं. तसेच श्रीदेवीचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर श्रीदेवींच्या पार्थिवासोबत अनिल अंबानी देखील सहभागी झाले. श्रीदेवी यांचं पार्थिव अगदी सुरक्षित पद्धतीने कपूर कुटुंबाकडून पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे याची जाणीव अंबानींना होती.