मुंबई : ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा सिनेमा 'धडक' प्रदर्शनापासून केवळ एक पाऊल दूर आहे. हा सिनेमा मराठी सुपरहीट सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे... सध्या 'सैराट'चा क्लायमॅक्स प्रेक्षकांना ठाऊक आहेच... पण, मग 'धडक'चा क्लायमॅक्स सैराटप्रमाणेच असणार की त्यात काही बदल केले जातील? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून होती... पण, जान्हवीनं नकळत या सिनेमाचा क्लायमॅक्स लीक करून टाकलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडच्या बहुतेक सिनेमांचा शेवट 'हॅप्पी'च होतो... अशावेळी जान्हवीला 'धडक'च्या क्लायमॅक्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं याची कल्पना दिली... 'या सिनेमात मी उदयपूरच्या एका शाही कुटुंबातल्या मुलीची भूमिका निभावतेय. धडक इतर बॉलिवूड सिनेमांसारखा नाही... ज्यामध्ये कटू सत्य लपवलं जातं... धडक हा बॉलिवूडचा मसालेदार सिनेमांपैंकीही नाही. ज्या प्रेमकहाण्यांत शेवटी आई-वडील विवाह मान्य करतात किंवा पारंपरिक सिनेमांप्रमाणे हॅप्पी एन्डींग होते. या सिनेमात आयुष्यातलं सत्य ढळढळीतपणे मांडलंय' असं जान्हवीनं म्हटलंय. 


बॉलिवूडमधल्या बहुचर्चित 'नेपोटिझम'वरही (वंशवाद) जान्हवीनं आपलं म्हणणं मांडलंय. 'जे लोक बॉलिवूड कुटुंबांतून नाहीत त्यांच्यातल्या अनेकांमध्ये आपल्याकडून संधी हिणावली गेल्याची भावना आहे. म्हणूनच मी माझी जबाबदारी जाणते... मला जी संधी मिळालीय त्या संधीचा चुकीचा फायदा मी कधीही घेणार नाही. मला ही संधी मिळालीय म्हणून मी आभारी आहे' असं जान्हवीनं म्हणत प्रेक्षकांची मनं जिंकलीत.