मुंबई : 'तुम्हारी सुलू', 'मिशन मंगल' या चित्रपटांमधून झळकल्यानंतर अभिनेत्री विद्या बालन आता 'शकुंतला देवी-ह्यूमन कंप्यूटर' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात तिच्या पतीची भूमिका अभिनेता जीशु सेनगुप्ता बाजावणार आहेत. चित्रपटात जीशु, परितोष बॅनर्जी यांची भूमिका साकारताना झळकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीशू सेनगुप्ता हे बांग्ला चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे. गणिततज्ज्ञ 'शकुंतला देवी', या चित्रपटातून विद्या आणि जीशू दुसऱ्यांदा एकत्र झळकणार आहेत. या माध्यमातून एका असामान्य व्यक्तीमत्वाच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.


त्याचप्रमाणे, अभिनेत्री सान्या मल्होत्रासुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. शकुंतला देवी यांच्या मुलीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. त्यामुळे आई आणि मुलीची ही जोडी आता प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन अनु मेनन करत आहेत. 


शकुंतला देवींचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरूमध्ये झाला. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.