जितेंद्र जोशीने आपल्या सर्वात मोठ्या भीतीवर अशी केली मात
Extraordinary चा खरा अर्थ कळला
मुंबई : प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते. त्या भीतीवर मात करणं ही खूप मोठी गोष्टी असते. अशीच एक भन्नाट गोष्ट अभिनेता जितेंद्र जोशीने केली आहे. जितेंद्र जोशीला उंचीचा फोबिया आहे. यावर त्याने अनोख्या पद्धतीने मात केली आहे.
Ready to Fly म्हणतं जितेंद्रने भीतीवर केली मात
जितेंद्र जोशी या अवलिया कलाकाराने हिमालयात पॅरा ग्लायडिंग केलं आहे. हा अनुभव त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. उंचीची भीती असण्यावर या अगोदरही जितेंद्रने मांडलं होतं. पण आता आपण या भीतीवर मात केली आहे.
या पोस्टमध्ये जितेंद्र लिहितो की, मला आता खरा Extraordinary चा अर्थ कळला आहे. उंची हा माझा सर्वात मोठा फोबिया. जे मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते केलंय. मी चक्क आकाशात उंच उडत होतो. मला आता खऱ्या अर्थाने Extraordinary चा अर्थ कळला आहे. हा अनुभव मला रोज अनउबवता यावा असं वाटतंय.
जितेंद्र जोशी कायमच आपल्या अभिनयामुळे, कवितांमुळे लोकप्रिय आहे. त्याच्यावर प्रेक्षक आणि कलाकारही मनापासून प्रेम करतात. जितेंद्रच्या या पोस्टखाली अनेक कलाकारांनी त्याचं कौतुक केलं होतं. अनेकांनी पोस्ट करून जितेंद्रचं अभिनंदन केलं आहे.
एप्रिल महिन्यात अनेक मराठी आणि हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार होते. मल्टीप्लेक्स बंद असल्याने सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याचा 'गोदावरी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोनाचा फटका सिनेमाला बसल्याची पोस्ट त्याने शेअर केली आहे.