जितेंद्र - हेमा यांचं होणार होतं लग्न, रोमांचक आहे दोघांची लव्हस्टोरी
जितेंद्र यांच्या आयुष्यातील कटू सत्य
मुंबई : बॉलिवूडमध्ये 'जंपिंग जॅक' म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र (Jitendra) यांचा आज वाढदिवस. 79 वा वाढदिवस जितेंद्र साजरा करत आहेत. जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 मध्ये अमृतसरमधील एका व्यावसायिकाच्या कुटुंबात झाला. जितेंद्र यांचं खरं नाव रवी कपूर असं आहे. (Jitendra want to marry with Hema Malini, But Dharmendra One Call change his life) जितेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया एक रोमांचक लव्हस्टोरी
जंपिंग जॅकचा मिळाला किताब
जितेंद्र यांनी 1964 मध्ये गीत गाया पत्थरोंने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फर्ज' सिनेमातून लोकप्रियता मिळवली. ‘मस्त बहारों का मैं आशिक’ या गाण्यामधील स्टाइलला पसंत करण्यात आलं. त्यानंतर कारवां आणि हमजोली सिनेमात डान्स परफॉर्मन्स दिले. त्यांच्या डान्सची भरपूर चर्चा झाली. यानंतरच त्यांना 'जंपिंग जॅक' असं संबोधलं जावं लागलं.
जितेंद्र यांच्यावर शोभा करत होत्या प्रेम
शोभा कपूर जेव्हा 14 वर्षांच्या होत्या तेव्हाच त्या जितेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. जितेंद्र तेव्हा बॉलिवूडचे मोठे स्टार नव्हते. शोभा तेव्हा ब्रीटीश एअरवेजमध्ये काम करत होत्या. 31 ऑक्टोबर 1974 मध्ये जितेंद्र आणि शोभा कपूर यांनी लपून लग्न केलं. जितेंद्र यांच्याशी लग्न करण्यासाठी शोभा कपूर यांनी नोकरी देखील सोडली होती.
जितेंद्र हेमामालिनी यांच्यासोबत करणार होते लग्न
त्याकाळी जितेंद्र-हेमा यांनी वारिस (1969), भाई हो तो ऐसा (1972), गरम मसाला (1972), गहरी चाल (1973) सारख्या सिनेमात काम केलं आहे. हेमा धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत होती. मात्र धर्मेंद्र यांचा विवाह झाला होता म्हणून ते हेमामालिनीला कमिटमेंट करू शकत नाही.
जितेंद्र यांनी हेमामालिनीला प्रपोझ केलं होतं. हेमामालिनी यांनी हे प्रेम स्विकारून तिरूपती मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दरम्यान धर्मेंद्र यांचा फोन आला आणि हेमामालिनी यांनी लग्नाचा निर्णय बदलला.