नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र आणि अभिनेत्री आशा पारेख यांचा 'कारवां' चित्रपट हॅनान आयलॅंड आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवमध्ये दाखवण्यात येणार आहे. १९७१ साली प्रदर्शित झालेला 'कारवां' चित्रपट स्प्रिंग स्क्रीनिंग जेम्स ऑफ एशिया-स्पॉटलाइट ऑन इंडिया २०१९ मध्ये दाखवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्क्रीनिंगबाबत जीतेंद्र यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'कारवां' चित्रपटाला समितीद्वारे कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या दिवसासाठी निवडण्यात आल्याने आनंद होत असून स्वत:ला सन्मानित झाल्यासारखं वाटत असल्याचं जीतेंद्र यांनी म्हटलं आहे. जीतेंद्र यांनी हा अतिशय चांगला उपक्रम असून चीन आणि भारत यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचं जीतेंद्र यांनी म्हटलंय.



नासिर हुसेन दिग्दर्शित 'कारवां' एक थ्रिलर चित्रपट असून त्यात अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. 'कारवां'चं स्क्रीनिंग होणं ही भारतीय सिनेमांसाठी अभिमानाची, सन्मानाची गोष्ट असल्याचं बीजिंगमधील इंडिया चायना फिल्म सोसायटीचे संस्थापक किशोर जावडे यांनी म्हटलंय.


हा महोत्सव हॅनान द्वीपमधील सान्या शहरात २३ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.