मुंबई : वैचारिक मतभेदांवर आधारित ज्वलंत चित्रपट 'जेएनयू' 5 एप्रिल रोजी होणार रिलीज मुंबई, 12 मार्च 2024: भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये प्रतिदिन नवनवीन विषय , कथा चित्रपटाच्या स्वरूपात समोर येत आहेत. चित्रपट निर्माते खऱ्या समस्यांवर आणि घटनांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडत आहेत. असाच एक सिनेमा जेएनयू ५ एप्रिल रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. देशातील अनेक संस्थांमध्ये मतभेद , विचारांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. अशा अवस्थेमध्ये देशात असंतोष निर्माण होतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी (जेएनयू)" ह्या चित्रपटात मानवीय असंतोषाची तीव्र शक्ती आणि मानवी विचारांमधील विरोधाभास  दिसून येत आहे . या चित्रपटाचे पहिले खळबळजनक टीझर पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये एक भारतीय भगव्या रंगाचा भारताचा नकाशा धरून बसलेला दिसत आहे त्याचबरोबर एखादी शैक्षणिक संस्था, विद्यापीठ देश तोडू शकते का, असा प्रश्न उपस्थित करत आहे.


त्याच्या टीझर पोस्टरच्या अनावरणासह, चित्रपट प्रेक्षकांना सिनेमॅटिक जगाची पहिली झलक देतो.  पोस्टर स्वतःच एक दृश्य आपल्याला स्पष्ट पणे सांगत आहे.  ज्यामध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमधील वातावरण आणि गोंधळाचे चित्रण करत आहे. तीव्र मतभेदाच्या पार्श्वभूमीवर, भगव्या रंगात लपलेले भारताचे छायचित्र भितीदायक दिसते, हा नकाशा देशाची विखुरलेली ओळख प्रतीकात्मकपणे सादर करतो. टॅगलाइन असलेली शैक्षणिक संस्था राष्ट्राचे तुकडे करू शकते का? हा खूप गहन प्रश्न निर्माण करत आहे.


आपल्या अस्मिता आणि मूल्यांशी झगडत असलेल्या राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर जे.एन.यू. शिक्षण, राजकारण आणि विचारधारा यांच्यातीलअंतरसंबंध दर्शवत आहे. त्याच प्रकारे चित्रपटाचा आकर्षक कथानक , कटू सत्यांचा सामना करण्यास प्रेक्षकांना आव्हान करत आहे.


या चित्रपटाच्या निर्मात्या प्रतिमा दत्ता म्हणाल्या, 'जेएनयू हे एका चित्रपटापेक्षा खूप काही आहे, जेएनयू हे देशातील निषेधाच्या आवाजाचे विधान आहे, आम्हाला असा चित्रपट सादर करायचा आहे जो प्रेक्षकांवर प्रभावशाली , कायमस्वरूपी प्रभाव टाकेल आणि वास्तविक समस्येकडे लक्ष वेधेल. मला सांगायला खूप  अभिमान वाटतो की, जेएनयूची खरी वस्तुस्थिती दाखवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.


महाकाल मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची निर्मिती जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) निर्मात्या प्रतिमा दत्ता यांनी केली असून दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले आहे.चित्रपटात उर्वशी रौतेला, पीयूष मिश्रा, रवि किशन,  सिद्धार्थ बोडके,विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे, सोनाली सेगल सारखे प्रतिभावानकलाकार आहेत . हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.