जोधपुर : काळवीट शिकार प्रकरणावर पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज जोधपुर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खानला या प्रकरणावर जामीन मिळतो की, त्याला 5 वर्षांची पूर्ण शिक्षा भोगावी लागते याकडे साऱ्यांच लक्ष आहे. जोधपुर सत्र न्यायालयात आता थोड्यावेळात सलमान खानच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. जोधपुर सेशन कोर्टात सलमान खानची केस 24 व्या नंबरवर आहे. आता थोड्या वेळातच यावर सुनावणी होणार आहे. सलमान खानचे वकिल हस्तीमल सारस्वत आणि सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता देखील उपस्थित आहेत. 


अशी घालवली कारागृहातील रात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोधपुर मध्यवर्ती कारगृहात सलमान खानची पहिली रात्र भरपूर त्रासाची होती. शुक्रवारी कोर्टात जाण्या अगोदर सलमान खान वकिलांना भेटला. त्यावेळी त्यांच्यासोबत बॉडीगार्ड शेरा देखील उपस्थित होता. सलमानला जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले. त्याची ही बराक लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या शेजारीच असल्याचे कळते. तुरूंगात रवानगी होताच सलमानला कैदी नंबर १०६ ही ओळख मिळाली.  कालची अख्खी रात्र सलमानने अस्वस्थेत काढली.  तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री त्याने जेवणही केले नाही.  रात्री त्याना वरण-भात, कोबीची भाजी आणि चपाती दिली गेली. मात्र त्याने जेवणास नकार दिला. रात्री १२ वाजेपर्यंत सलमान त्याच्या बराकीबाहेर टेहळत होता.  यानंतर तो झोपायला बराकीत गेला.


असा होता आजचा दिनक्रम


आज सकाळी ६.३० वाजता सलमान उठला. उठल्यावर त्याला सकाळची न्याहारी देण्यात आली. पण त्याला ती आवडली नाही. मग त्याने तुरुंगातील कॅन्टिनमधून स्वत:साठी ब्रेड  आणि दूध मागवले. सलमानच्या कुटुंबानी कालच या कॅन्टिनमध्ये ४०० रूपये जमा केले होते. जेणे करून सलमान त्याच्या आवडीच्या वस्तू येथून घेऊ शकेल. तुरुंगातील कपडे घालण्यास सलमानने नकार दिला. कालच्याच कपड्यात त्याने अख्खी रात्र काढली. काल कोठडीत आल्यानंतर सलमानची आरोग्य तपासणी केली असता त्याचा रक्तदाब वाढला होता. मात्र काही तासात तो सामान्य झाला.