‘सविता दामोदर परांजपे’च्या निमित्ताने जॉन अब्राहम मराठीत
मुळात हा चित्रपट नाटकावर आधारीत आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ नाटकाने ८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवली होती.
मुंबई: तुम्ही जर जॉन अब्राहम आणि चित्रपटसृष्टीचे चाहते असाल तर, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. जॉन अब्राहमची निर्मिती असलेला 'सविता दामोदर परांजपे' हा चित्रपट येत्या येत्या ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वत: जॉन अब्राहमनेच ही माहिती त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून दिली आहे. या चित्रपटाबाबत सर्वत्र चर्चा सुरू असल्याचेही अब्राहमने म्हटले आहे.
जॉन पहिल्यांदाच मराठीत
‘सविता दामोदर परांजपे’या चित्रपटाच्या माध्यमातून जॉन अब्राहम मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पाऊल ठेवत आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची चंदेरी वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे या उत्सुकतेतूनच आपण चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रतर्शित होत असल्याची माहिती आपण ट्विटरद्वारे दिल्याचे जॉनने म्हटले आहे.
नाटकावर आधारीत चित्रपट
मुळात हा चित्रपट नाटकावर आधारीत आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ नाटकाने ८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवली होती. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका असणार आहे. तसेच, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट हे अभिनेतेही चित्रपटात दिसणार आहे. निलेश मोहरीर आणि अमित राज यांनी या चित्रपटास संगित देले आहे. तर, शिरीष लाटकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.