John Abraham Buys Bungalow : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमनं मुंबईच्या रियल एस्टेट मार्केटमध्ये खूप मोठी डील केली आहे. जॉननं मुंबईच्या खार परिसरातील लिंकिंग रोडवर तब्बल 75.07 कोटींचा बंगला खरेदी केला आहे. त्यासाठी जॉन अब्राहमनं 4.24 कोटी स्टॅम्प ड्यूटी दिली आहे. लिंकिंग रोडवर प्रॉपर्टीची किंमत ही खूप जास्त आहे. जाणून घेऊया जॉननं नक्की कुठे आणि कधी घेतली ही प्रॉपर्टी...


चित्रपटाच्या यशानंतर जॉननं खरेदी केला हा बंगला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉननं खार परिसरातील निर्मल भवन नावाचा बंगला खरेदी केला आहे. तर स्थानिक ब्रोकरांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रॉपर्टीची किंमत ही 40 हजार ते 90 हजार स्क्वेअर फीट आहे. तर हे सगळं त्या जागेच्या आणि प्रॉपर्टीवर आधारीत आहे. हा बंगला 7,722 स्क्वेअर फिटचा आहे. तर बंगल्याची बिल्डिंग ही 5,416 स्क्वेअर फिट परिसरात बांधण्यात आली आहे. तर बाकी जागेत गार्डन वगैरे आहे. तर जॉननं ही प्रॉपर्टी प्रवीण नाथलाल शाह यांच्याकडून खरेदी केली आहे. प्रॉपर्टी कंसल्टेंच कंपनी इंडेक्स टॅप डॉट कॉमनुसार, समुद्र किनाऱ्याच्या जवळ असणाऱ्या प्रॉपर्टीसाठी जॉननं 4.24 कोटी स्टॅम्प ड्यूटीसाठी मोजले आहेत. तर या प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रेशनच काम हे 27 डिसेंबर रोजी झाले. तर जॉनला पठाण या चित्रपटातून मिळालेल्या यशानंतर त्यानं त्याची मानधनाची रक्कम वाढवल्याचे देखील म्हटले जाते. त्याशिवाय त्यानं त्यामुळेच मिळालेलं यश पाहता त्यानं हा बंगला घेतल्याच्या चर्चा सुरु आहेत. 



वांद्रेच्या खार परिसरात अनेक सेलिब्रिटी आणि व्यावसायिक राहतात. प्रत्येक लोकप्रिय असलेल्या व्यक्तीला इथे स्थायिक व्हायचे आहे. एक लाख रुपयांपासून 1.50 लाख स्क्वेअर फीट असा इथे दर असल्याचे देखील म्हटले जाते. तर शुक्रवारी वांद्रे परिसरात असलेल्या आमिर खानच्या सोसायटीच्या रिडिव्हलपमेंटची डील फायनल झाली होती.


गेल्या महिन्यात प्रीति जिंटानं देखील पाली हिल परिसरात 17.01 कोटींमध्ये एक फ्लॅट खरेदी केला. याशिवाय मुंबईतील सेलिब्रिटींच्या घरांविषयी बोलायचे झाले तर अनेक सेलिब्रिटींना बंगल्यात रहायला आवडतं. त्यात एक अमिताभ बच्चन यांचा बंगला आहे. तर त्यांनी नुकताच त्यांचा प्रतीक्षा बंगला हा लेक श्वेता नंदाच्या नावी केला. जुहूत असलेला हा बंगला 890.47 आणि 674 स्क्वेअर मीटरच्या दोन प्लॉट्समध्ये बांधण्यात आला होता. या प्रॉपर्टीचा गिफ्ट डीड हा 8 नोव्हेंबरला साइन करण्यात ाला. या ट्रान्जेक्शनवर 50.65 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी देण्यात आली होती.