मुंबई : जॉन अब्राहमने त्याचा आगामी सिनेमा 'परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा सिनेमा १९९८ मध्ये भारत सरकारद्वारे राजस्थानच्या पोखरणमध्ये जमिनीच्या अंतर्गत परमाणू तपासणीवर आधारित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात बोमन इराणी, डायना पेंटी यांचाही समावेश आहे. सिनेमाची शूटींग मुंबई आणि दिल्लीमध्ये करत आहे.


भारत सरकारकडून प्रथम परमाणू चाचणी १८ मे १९७४ आणि दुसरी चाचणी ११ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरण फिल्ड फायरिंग रेंजमध्ये केली गेली होती. यानंतर पोखरण जगाच्या नकाशावर एक शक्तीस्थान म्हणून उभा राहिला. त्याच आठवणी ताज्या करण्यासाठी, हा चित्रपट दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार केला जात आहे.