मुंबई : बॉलिवूडमध्ये युद्धप्रसंगांवर आधारीत सिनेमांची नेहमीच चलती राहिलीय. जे पी दत्ता यांचा 'बॉर्डर' असेल किंवा 'एलओसी कारगिल'... देशासाठी मरायला तयार असणाऱ्या शूर-जवानांसाठी भारतीयांच्या भावना, संवेदना सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. अभिनेता अक्षय कुमार आता एका देशभक्ताच्या रुपात समोर येतोय अभिनेता जॉन अब्राहम... आपल्या ऍक्शन सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेला 'रोमिओ अकबर वॉल्टर' पुन्हा एकदा पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात उतरण्यासाठी तयार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमात जॉन अब्राहम एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचा ट्रेलर जॉननं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. १९७१ मध्ये झालेल्या इंडो-पाक युद्धाच्या पार्श्वभूमिवर हा सिनेमा बेतलेला आहे. सिनेमात दिसणारी देशभक्ती प्रेक्षकांना मोठ्या पडद्याकडे खेचून आणण्यासाठी पुरेशी आहे, असं दिसतंय.



'रॉ' हा सिनेमा दिग्दर्शित केलाय रॉबी गरेवाल यांनी... या सिनेमात जॉनसोबत मौनी रॉयही दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात जॅकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमूर्ति आणि सिकंदर खेर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.