Oscars 2024 : `ऑस्कर्स`च्या सोहळ्यात WWE सुपरस्टार जॉन सीना नग्नावस्थेत आला अन्...
Oscars 2024 John Cena: नक्की काय झालं! जॉन सीनाला स्टेजवर नग्नावस्थेत पाहताच, लोक धावले अन्...
John Cena Oscars 2024 News: चित्रपटसाठी असलेला जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार नुकताच पार पडला. हा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर 2024. पुन्हा एकदा वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कलाकारांना त्यांचा कामाची पावती या पुरस्कार सोहळ्यातून मिळते. या पुरस्कार सोहळ्यात जे विजेते ठरतात त्यांच्यासाठी हा फार खास क्षण असतो. ते सगळीकडे चर्चेचा विषय ठरतात. मात्र, यावेळी सगळ्यांचा चर्चेचा विषयी हा जॉन सीना ठरला आहे. जॉन सीन अचानक स्टेजवर आला आणि त्याला पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. त्यांचं कारण म्हणजे जॉन सीना हा कपड्यांशिवाय स्टेजवर आला. जॉन सीनाला जिमी किमेलसोबतच्या सेगमेन्टसाठी स्टेजवर बोलावण्यात आले होते. यावेळी जॉनसीना हा न्यूड दाखवण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
जॉन सीना स्टेजवर आला आणि किमेलला शेवटच्या क्षणी सांगितलं की तो हे करु शकणार नाही. जॉन सीना किमेलला म्हणतो की 'पुरुषाचं शरीर हा विनोद नाही.' त्यावर किमेल म्हणतो 'माझं आहे.'त्यानंतर सगळे प्रेक्षक हसू लागतात. मग काय अखेर जॉन सीनाला पुरस्काराची घोषणा करायची असते. तर तो विजेत्याचं नावं असलेलं एन्व्हलप घेऊन स्वत: चं शरीर लपवत हळू-हळू स्टेजवर येतो. हे पाहून पुन्हा एकदा तिथे उपस्थित असलेले सगळ्यांना हसू अनावर होतं. आता विजेत्याच्या नावाची घोषणा करायची असली तरी जॉन सीना ते करु शकत नव्हता. कारण त्यानं कपडे परिधान केले नव्हते. अशात माईकवर आल्यानंतर जॉन सीना हा लाजतो आणि कपडे किती महत्त्वाचे असताता ते सांगतो. जॉन सीना म्हणतो की कपडे खूप महत्त्वाचे आहेत. मला तर वाटतं सगळ्यात महत्त्वाचे आहेत. खरंतर जॉन सीना यावेळी सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूमच्या नॉमिनेशनची घोषणा करण्यासाठी स्टेजवर आलेला असतो. त्यानंतर काही लोक येतात आणि त्याला कपडे परिधान करतात.
हेही वाचा : Oscar 2024 : 'ऑस्कर्स'नेही ठेवली नितीन चंद्रकात देसाईंची आठवण! पाहा त्या भावूक क्षणाचा Video
'पुअर थिंग्स' ला कॉस्ट्यूम डिझाइनसाठी असलेला ऑस्कर पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट हेअर आणि मेकअप, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूमसाठी लागोपाठ असे तीन पुरस्कार मिळवले. तर एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर 'पुअर थिंग्स' ला एकूण 4 विभागात पुरस्कार मिळाले आहेत.