चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. कधी अमिताभ बच्चन आणि अभिषेक, कधी ऋषी कपूर आणि रणबीर कपूर तर कधी धर्मेंद्र आणि सनी, बॉबी देओल... यांना ही आपण एकत्र पाहिलं आहे. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश  होणार आहे. ती जोडी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर. ‘अफलातून’ या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया केली आहे. 'अ डिफेक्टीव्ह कॅामेडी; असं म्हणत ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनी लिव्हर यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. आता ‘अफलातून’ च्या माध्यमातून आपल्या मुलासोबत ते एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातही ते दोघे वडील आणि मुलाच्याच भूमिकेत दिसणार आहेत. यात  जॉनी लिव्हर 'नवाब साहब' च्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या मुलाची 'आफताब’ची  भूमिका जेसी लिव्हरने  साकारली आहे.  ‘अफलातून’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आम्हांला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं दोघेही सांगतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या दोघांसोबत ‘अफलातून’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा,  रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपटाचा धमाल टीझर आज  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


हेही वाचा : "लग्न झालेलं असताना परपुरुषासोबत...," किस किंवा इंटीमेट सीन देण्यावर 'जवान' अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य


‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत.  छायांकन  सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन  रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा  मीनल डबराल गज्जर हिची असून  कलादिग्दर्शन नितीन  बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए .ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर,  शीला जगताप, अश्विन  पद्मनाभन,  सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत.ऑनलाईन निर्माते अवधू