मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी कलाकारांचा खूप बोलबाला आहे.  मात्र, यात असं एक नाव आहे, जे कॉमेडीचा बादशाह म्हणून प्रत्येकाच्या हृदयात राज्य करत आहे. वास्तविक, आज आम्ही जॉन प्रकाश राव जानुमाल उर्फ जॉनी लीवरबद्दल बोलत आहोत. भारतातील पहिला स्टँड-अप कॉमेडियन. ज्यांनी सुमारे 350 चित्रपट केले आणि 13वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनी लीव्हरचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला
14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशात जन्मलेले जॉनी लीव्हर आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जॉनीचं सुरुवातीच्या दिवसातं त्यांचं कुटुंब अत्यंत गरीब होतं. तो त्याच्या 4 भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. त्याला 3 लहान बहिणी होत्या. अशा परिस्थितीत त्याने 7वीच्या वर्गात शिक्षण सोडून खूप लहान वयात कुटुंबाची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली.


जॉनी लीव्हर पेन विकायचा
जॉनी लीव्हरने रस्त्यावर पेन विकायला सुरुवात केली. मात्र, त्याच्यामध्ये नेहमीच एक विनोदी कलाकार होता जो वेळोवेळी बाहेर येत असे. जॉनी कलाकारांचं एक्टिंग करून रस्त्यावर पेनही विकायचा. यासोबत, यामधून तो 5 रुपये कमावत असे, जे त्याच्यासाठी पुरेसं होतं.


आजही तीच शैली जॉनी लीव्हरच्या कॉमेडीमध्ये दिसते. त्याचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, त्याची एक खासियत म्हणजे त्याला कितीही ऐकलं तरी त्याचा कधीच कंटाळा येत नाही.


अशातच सुनील दत्तची नजर पडली
एका स्टेज शो दरम्यान त्याची नजर अभिनेता सुनील दत्तवर पडली. जॉनी लीव्हर त्याला पाहून त्याला प्रभावित झाला. त्यानंतर त्याने 1982 मध्ये आलेल्या 'दर्द का रिश्ता' चित्रपटात जॉनीला पहिला ब्रेक दिला. इंडस्ट्रीत पाऊल टाकताच त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं, साईड रोलमध्ये असूनही, जॉनी लीव्हरला अनेकदा हिरोपेक्षा जास्त पसंती मिळाली. यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजही तीच शैली जॉनी लीव्हरच्या कॉमेडीमध्ये दिसते. त्याचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, त्याची एक खासियत म्हणजे त्याला कितीही ऐकले तरी त्याला कधीच कंटाळा येत नाही.