'छोटा छत्री' आणि 'असलम भाई' ही त्यांची प्रसिद्ध व्यक्तिरेखा  प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. जॉनी लीव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. 'कॉमेडी किंग' म्हणून ओळखले जाणारे जॉनी लीव्हर आपल्या संवाद शैली आणि विनोदाची अद्भुत टाइमिंगसाठी प्रसिद्ध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनी लीव्हर यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्याचे करिअर यांचे वर्णन खूप प्रेरणादायक आहे. एकेकाळी ते रस्त्यावर पेन विकत होते आणि जीवनाशी लढत होते. त्यांच्या वडिलांच्या मद्यपानामुळे त्यांना त्रास झाले आणि त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु त्यांनी खूप संघर्ष केला आणि आज बॉलिवूडमध्ये एक सुपरस्टार बनले. 


जॉनी लीव्हर यांची सुरुवात आणि संघर्ष
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जॉनी लीव्हर पुण्याच्या रस्त्यावर मिमिक्री करायचे. तिथे त्यांना प्रसिद्ध स्टार्सच्या नकलांसाठी 100 रुपये मिळायचे. जॉनी लीव्हर यांनी  शाहरुख, सलमान आणि आमिर खानसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं, पण त्यांना या यशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कठीण प्रवास करावा लागला.



बॉलिवूडमध्ये जॉनी लीव्हरचे योगदान
जॉनी लीव्हर यांनी 'दिलवाले', 'गोलमाल अगेन', 'राजा हिंदुस्तानी', 'खट्टा मीठा' आणि 'मेला' यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये हास्याचा तडका लावला. त्यांच्या उत्तम कॉमेडी टायमिंगमुळे प्रत्येक भूमिका लोकप्रिय झाली आहे. 'नरसिंहा'मधील टंपू दादा, 'करण अर्जुन'मधील लिंगैया, 'राजा हिंदुस्तानी'मधील हार्दिक सरदार बलवंत सिंग आणि 'नायक'मधील कॅमेरामन टोपी यासारख्या भूमिका लोकांच्या आठवणीत कायम आहेत.


हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/vidyut-jammwal-is-seen-pouring-melted-candle-on-his-face-video-went-viral/872247


हाऊसफुल 5 मध्ये जॉनी लीव्हर यांचा कमबॅक
जॉनी लीव्हर आता 'हाऊसफुल 5' चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, आणि सोनम बाजवा यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश आहे. जॉनी लीव्हरच्या विनोदी आणि टाइमिंगसह त्यांच्या जादूला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाका करायला मिळणार आहे.


जॉनी लीव्हर यांची ही संघर्षाची कथा आणि त्यांचे यश सिद्ध करते की, कठीण काळातही जर आपल्याला मेहनत करण्याची इच्छाशक्ती असेल, तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकते.