Johnny Lever Trolled : तब्बल 42 दिवस जीवन-मरणाशी झुंज दिल्यानंतर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava)  यांनी 21 सप्टेंबर रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या प्रार्थना सभेचे (Prayer Meet) आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, चित्रपट आणि टीव्हीशी संबंधित अनेक सेलिब्रिटींनी राजू श्रीवास्तव यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्यांच्या प्रार्थना सभेला (Prayer Meet) हजेरी लावली. राजू श्रीवास्तव हे एक विनोदी कलाकार होते ज्यांनी नेहमीच फक्त आणि फक्त हसवण्याचं काम केलं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मात्र प्रार्थना सभेत उपस्थित असलेल्या जॉनी लीव्हर (Johnny Lever) यांच्या कृत्यामुळे सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आहेत. जॉनी लीव्हर (Johnny Lever) जेव्हा या प्रार्थना सभेत (Prayer Meet) पोहोचला तेव्हा बाहेर मीडियाचा जमाव जमला होता. यावेळी प्रत्येक सेलिब्रिटीला थांबून पोज देण्याची विनंती करण्यात येत होती. त्यामुळे जॉनी लीव्हर यांनी थांबून फोटोग्राफर्ससाठी पोज दिली. पण  पोज देताना त्यांच्या हसण्याने लोकांना धक्का बसला. (johnny Lever reached Raju Srivastava prayer meeting trolled for posing for a picture with a laugh)


कॉमेडियन आणि अभिनेते असलेल्या जॉनी लीव्हर (Johnny Lever) यांचे हसणे लोकांना आवडले नाही. म्हणून त्यांनी सोशल मीडियावर यावरुन टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


माध्यमांशी संवाद साधताना जॉनी लीव्हर यांनी राजू श्रीवास्तव यांच्याबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधाबाबत भाष्य केले. "माझ्याबरोबरच राजूचेही स्ट्रगल सुरु झाले. आमचे कौटुंबिक संबंध होते आणि आम्ही शेजारीही आहोत. आपण सर्वांनी एक उत्कृष्ट कलाकार गमावला आहे. राजूने अनेक वर्षे अनेकांना हसवले पण अचानक आम्हाला सोडून गेला," असे जॉनी लीव्हर म्हणाले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Elite (@eliteshowbiz)


10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव दिल्लीत व्यायम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत एम्समध्ये दाखल करण्यात आले जेथे ते सुमारे 42 दिवस दाखल होते. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु 21 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.