ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचं समर्थन करणं जॉनी लिव्हरला पडलं महागात
ट्रोलर्सच्या निशाण्यावर जॉनी लिव्हर; सोशल मीडियावर चर्चा
मुंबई : ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यनच्या कुटुंबाला आशा होती की त्याला बेल बॉन्डच्या आधारावर जामीन मिळेल. पण आर्यनच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पुढे काय होईल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 ऑक्टोबर रेजी एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड एकत्र आलं आहे. पण विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरला आर्यनचं समर्थन करणं महागात पडलं आहे.
अभिनेता शाहरूख खान आणि जॉनी लिव्हरने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर जॉनी लिव्हर यांनी शाहरुख सोबतचा कुछ कुछ होता है चित्रपटातील एक फोटो शेअर केला. या फोटोमुळे ट्रोलर्सने जॉनीला निशाण्यावर धरले आहे. जॉनीच्या पोस्टवर अनेकांच्या कमेन्ट्स येत आहेत.
एका युझरने कमेन्टमध्ये 'ड्रग्स पॉवर...' दुसऱ्या युझरने 'तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हाती.' असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या युझरने, 'हाहाहा... बॉलिवूड नेहमी गुन्हेगारांना पाठिंबा देतो...' अशी कमेन्ट केली आहे. सध्या जॉनीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.