मुंबई:उरी-द सर्जिकल स्ट्राईक’आणि ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे दोन सिनेमे वर्षाच्या सुरूवातीला प्रदर्शित झाले. बॉलिवूडमध्ये नेहमीच दोन मोठ्या स्टारच्या सिनेमांच्या प्रदर्शनाची  तारीख एकाच दिवशी येते. सिनेमांची तारीख एकाच दिवशी येणे ही आता एक सामान्य बाब झाली आहे. अशात कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार हे पाहणे गमतीचे असते. 2018 साली अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम दोघांच्या सिनेमांनी एकमेकांच्या सिनेमांना टक्कर दिली होती. 2019 मध्ये पुन्हा असे होताना दिसणार आहे. यंदाच्या वर्षी जॉन अब्राहम चा सिनेमा बाटला हाउस आणि अक्षय कुमार चा सिनेमा मिशन मंगल हे दोन सिनेमे एकमेकांना टक्कर देतील आशी शंका आहे. दोन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाची  तारीख 15 ऑगस्ट 2019  आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 मध्ये सुध्दा दोन  मोठ्या स्टारचे सिनेमे एकमेकांना धडकले होते. एका बाजूला अक्षय चा गोल्ड तर दुसऱ्या बाजूला जॉन चा सत्यमेव जयते प्रदर्शित झाला होता. गोल्ड ने बॉक्स ऑफिस वर दमदार कमाई केली होती. तर सत्यमेव जयते बॉक्स ऑफिस वर फेल झाला. आता या वर्षी कोणाचा सिनेमा धमाकेदार ठरणार हे पाहणे गमतीचे असणार आहे.


2019 मध्ये में जॉन अब्राहम आणि अजय देवगन चा सिनेमा एकमेकांना धडकणार आहे.जॉन चा सिनेमा 'रोमियो अकबर वॉल्टर' आणि अजय देवगन चा सिनेमा 'दे दे प्यार दे' प्रदर्शित होणार आहे. 12 एप्रिल 2019ला प्रदर्शित होत आहेत. डीएनएच्या सूत्रां नुसार आता हे सिनेमे एकाच तारखेला प्रदर्शित होणार नाहीत.दे दे प्यारच्या निर्मात्यांनी सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.जॉन चा 'रोमियो अकबर वॉल्टर' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तरण आदर्शयांच्या सांगण्यानुसार 12 एप्रिल 2019ला प्रदर्शित होत आहे.