Jr. NTR Fans Accidently Burned Theater : ज्युनियर एनटीआर हा दाक्षिणेत्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ज्युनियर एनटीआरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे त्याचे चाहते आता फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. ज्युनियर एनटीआरनं 20 मे रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी सेलिब्रिटींपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याचा 20 वर्ष जुना चित्रपट 'सिम्हादारी' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट पाहत असताना ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांचा स्वत: वरचा ताबा सुटला आणि अचानाक चित्रपटगृहात आग लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी विजयवाडामध्ये असलेल्या थिएटरमध्ये ज्यूनियर एनटीआरचा चित्रपट पाहत असताना त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. त्यांना झालेला आनंद सेलिब्रेट करत असताना. ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले. त्यामुळे चित्रपटगृहात आग लागली. त्यामुळे थिएटरमध्ये असलेल्या काही खुर्च्यांना आग लागली. त्यामुळे थिएटर मालकाचं नुकसान झालं आहे. यावेळी थिएटरमधील आग लागली त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 



ज्युनियर एनटीआरच्या कामाविषयी बोलायते झाले तर तो लवकरच देवरा या चित्रपटात दिसणार आहे. ज्युनियर एनटीआरनं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता. सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे ज्युनियर एनटीआरसोबत या चित्रपटात एक बॉलिवूड अभिनेत्री दिसणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जान्हवी कपूर आहे. तर त्या दोघांशिवाय या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान देखील दिसणार आहे. या चित्रपटातून जान्हवी आणि सैफ दोघेही तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. तर अशा चर्चा आहेत की या चित्रपटात ज्युनियर एनटीआरच्या दोन भूमिका असून तो वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. 


हेही वाचा : The Kerala Story BO Day 18: अदा शर्माच्या चित्रपटानं 18 व्या दिवशी केला 200 कोटींचा आकडा पार


ज्युनियर एनटीआरचा आरआरआर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला जगभरात लोक ओळखू लागले होते. त्याच्या सोबत फोटो काढण्यासाठी तर जपानमध्ये प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजिनल सॉन्गसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. नाटू नाटू या गाण्यानं ऑस्कर मिळवताच संपूर्ण भारतीय जनतेला आनंद झाला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांनी देखील भूमिका साकारल्या होत्या.