जुबिनच्या प्रेमात ती इतकी बुडाली की, लग्नाच्या चर्चेदरम्यान हॉटेलमधील खाजगी फोटो समोर
एकमेकांना डेट करत असल्याची बातमी व्हायरल होऊ लागली.
मुंबई : सध्या बॉलिवूडच्या दोन स्टार्समधील प्रेमाची जोरदार चर्चा होत आहे, ते स्टार्स म्हणजे प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल आणि कबीर सिंग फेम अभिनेत्री निकिता दत्ता...
जुबिन आणि निकित दत्ता एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच ते लग्न करणार असल्याचं समोर येत आहे, या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही, मात्र आता नुकतेच जुबिनने या बातम्यांवर मौन सोडले आहे. आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका संवादात जुबिन म्हणाला, 'मी यावर भाष्य करू इच्छित नाही. मी निकिताला 'एक दुजे के वास्ते' या टीव्ही शोमध्ये काम करत असल्यापासून ओळखतो. मी त्या शोमधलं एक गाणं गायलं आणि मग आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागलो.
पुढे जुबिन म्हणाला, "निकिता आणि मी जुहूच्या एका कॅफेमध्ये हँग आऊट करत होतो. आम्ही डेट करत आहोत की नाही यावर मला भाष्य करायला आवडणार नाही, कारण एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडते आणि याबाबत चर्चा व्हावी असं आम्हाला वाटत नाही."
नुकतेच आता जुबिन आणि निकिता एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते, त्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांना डेट करत असल्याची बातमी व्हायरल होऊ लागली.
बातम्यांनुसार, दोघेही कबीर सिंगच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. ज्यामध्ये निकिता काम करत होती, तर जुबिनने 'तुझे कितने चाहने लगे हम' हे चित्रपटाचे हिट गाणे गायले होते. दोघांची भेट झाली आणि मग दोघांच्या नात्याला सुरुवात झाली असल्याचं बोललं जात आहे, पण याबाबत जुबिनने मौन पाळण्याचा निर्णय घेतलायं.