पद्मावतीचा वाद : दीपिकाबद्दल जुही चावलाने दिली अशी प्रतिक्रिया
संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाबाबत वाद कायम आहे. कलाकारांच्या देखील यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई : संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाबाबत वाद कायम आहे. कलाकारांच्या देखील यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जुहीने मांडली भूमिका
जुही चावलाने मात्र पद्मावतीबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे पण दीपिकाबाबत तिने मत व्यक्त केलं आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अभिनेत्री जुही चावलाने म्हटलं की, 'दीपिका पदुकोणला धमकी देणं हे चुकीचं आहे. सिनेमाबाबत मला काही म्हणायचं नाही पण चित्रपटाच्या कलाकारांना धमक्या देणं चुकीचं आहे.'
'तुम्ही नंतर त्याच अभिनेत्रीला दुसऱ्या चित्रपटांमध्ये बघता आणि तिच्यासाठी वेडे होऊन जाता आणि त्यांच्यावर प्रेम करता. दीपिकाची फॅन फॉलोविंग भरपूर आहे. रागात भडकण्यापेक्षा संवेदनशील गोष्टीवर प्रतिक्रिया द्या. जुहीने हे देखील सांगितले की, नुकतीच ती जयपूरमधील एका विवाह समारंभामध्ये गेली होती, तेव्हा ती राजमाताला भेटली होती.'
राजमातांसोबत झाली चर्चा
जुही म्हणते की, 'राजमाता चित्रपटांविषयी बोलत होत्या, त्यांनी म्हटलं की, आपण किती पुस्तके वाचातो आणि इतिहास जाणून घेऊ इच्छितो. पण निश्चितपणे सर्वांना चित्रपट पाहायचा आहे. स्क्रीनवर दाखवलेल्या गोष्टी लोकांच्या डोक्यात नेहमी राहतं. बस त्यांनी ऐवढंच म्हटलं. पद्मावतीचा यामध्ये काहीही संबंध नव्हता. राजमाता यांनी चित्रपटाच्या प्रभावाबद्दल एक सामान्य चर्चा केली.'