Juhi Chawla On Salman Khan Viral Video : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) मुळे चर्चेत आहे. त्याचा हा आगामी चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान हे नेहमीच त्याच्या प्रोफेश्नल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो. आजवर सलमानचं नाव अनेक सेलिब्रिटींशी जोडण्यात आलं आहे. प्रत्येकवेळी कोणत्या अभिनेत्रीसोबत नाव जोडल्यानंतर सलमानच्या लग्नाची चर्चा ही सुरु होते. दरम्यान, एक काळ असा होता जेव्हा सलमानचं नाव हे अभिनेत्री जूही चावलाशी (Juhi Chawla) जोडण्यात आलं होतं. इतकंच काय तर सलमानला जूही चावलाशी लग्न करायचे होते. दरम्यान, आता जूही चावलानं यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सलमान खान म्हणाला की एकेकाळी जूही चावला त्याला खूप आवडायची. इतकंच काय तर त्यानं जुहीच्या वडिलांकडे तिचा हात मागितला होता. पण त्यांनी नकार दिला आहे. असं असू शकतं की त्यांना मी पसंद नव्हतो. त्यांना काय पाहिजे होतं काय माहित. असं सुद्धा असू शकतं की मी त्यांच्या मुलीच्या बरोबरीचा नाही असं त्यांना वाटलं असेल. दरम्यान, यावर आता जूहीनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. जुही याविषयी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. 


हेही वाचा : '...तर नवऱ्यालाच सोडेन', Gautami Patil चं लग्नाआधीच मोठं वक्तव्य


यावेळी जुही म्हणाली की जेव्हा त्यानं चित्रपटसृष्टीत करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा सलमान द सलमान नव्हता जो आता आहे. ज्या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका होती त्या चित्रपटासाठी मला विचारण्यात आलं होतं. त्यावेळी मी कोणालाही ओळखत नव्हते. तो नाही, आमिर किंवा मग इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीला नाही. काही कारणांमुळे ती तो चित्रपट करू शकली नाही. मी त्याच्यासोबत कोणता चित्रपट केला नाही याची आजही सलमान आठवण करून देतो. 



जूहीनं चावलानं सलमानसोबत कोणत्या चित्रपटात काम केलं नसलं तरी त्या दोघांनी स्टेज शो केले आहेत. याशिवाय सलमानच्या दीवाना मस्ताना या चित्रपटात तिनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. दरम्यान, जूहीनं 1995 साली बिझनेसमॅन जय मेहताशी लग्न केलं. तर जय आणि जूही यांना दोन मुलं आहेत. मुलीचं नाव जान्हवी आणि मुलाचं नाव अर्जुन आहे.