Jui Gadkari Viral Post : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत जुई सायली नावाची भूमिका साकारताना दिसत आहे. जुई एक अभिनेत्री असल्यामुळे लोक सोशल मीडियावर अनेक गोष्टी सर्च करत असतात. इतकंच काय तर अनेक लोक त्यांना पटेल ते बोलताना दिसतात. अशा वेळी अनेकांना त्या अफवा सत्य असल्याचे वाटते आणि ते देखील हे सत्य आहे असं म्हणत इतरांना सांगत असतात. अशात आता जुई तिच्याविषयी  पसरवण्यात येणाऱ्या अफवांविषयी सांगितले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी जुई गडकरीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे तिला मालिकेचे शूटिंग करता येणार नाही असे म्हटले जात होते. मात्र, या अफवेवर तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही अफवा असल्याचे सांगितले. या पोस्टमध्ये जुई गडकरीनं तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत जुई म्हणाली, '13 वा आठवडा नं 1 खूप आणि खूप ग्रेट फूल आहे माय बाप रसिक प्रेक्षकांचे आभार!!! तुमच्या प्रेमाने मी भाराऊन गेलेय! बघत राहा “ठरलं तर मग!” सोम- शनि रा ८.३० वाजता STAR Pravah वरआणि हो, मी ठणठणित आहे! रोज शुट करत आहे! माझ्या अपघातामुळे मला ”गंभीर” दुखापत झाली आणि आता मला शुट करता येणार नाही असे व्हिडियोज सध्या फिरत आहेत! त्याकडे कृपया लक्ष देऊ नये!! तुमच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छांमुळे मी सुखरुप आहे!! तसं तर युट्युब वर माझी अनेकदा लग्नं पण झालियेत आणि मला दोन मुलं पण आहेत, माझे अमेरीकेत, दुबईत बंगले पण आहेत! या गोष्टींकडे लक्ष न दिलेलंच बरं!!! असो! तुम्ही मालिका बघताय ना???” अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे.



हेही वाचा : शेवटी आईच ती...! कान्सच्या रेड कार्पेटवर लेकीला पाहून Sapna Choudhary च्या आईची अशी झाली अवस्था


जुईची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या बाजूने प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दर्शवला आहे. सोबतच तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या मालिकेविषयी बोलायचं झालं तर गेल्या 13 आठवड्यांपासून ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ही मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. जुई गडकरी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जुईने 'पुढचं पाऊल' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती