मुंबई : श्रीदेवी या ८०-९०च्या दशकातील अशा अभिनेत्री होत्या ज्यांना 'फर्स्ट लेडी सुपरस्टार' बोललं जातं होतं. एक असा काळ होता, ज्यावेळी श्रीदेवी करियरच्या यशशिखरावर होत्या. त्यांचे एका-मागे एक अनेक चित्रपट सुपरहीट ठरत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांची लोकप्रियता बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात वाढत होती. याच दरम्यान त्यांना हॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट 'जुरासिक पार्क'मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. 


'जुरासिक पार्क' चित्रपटाचे दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांना या चित्रपटात श्रीदेवी यांना छोटीशी भूमिका द्यायची होती. पण श्रीदेवींनी त्यांच्या इतर चित्रपटांच्या व्यस्ततेमुळे आणि बॉलिवूडमध्ये त्यांच्या वाढत्या प्रतिष्ठेमुळे 'जुरासिक पार्क'मध्ये काम करण्यास नकार दिला असल्याचं बोललं जातं. 


श्रीदेवी यांना त्यावेळी मोठ-मोठ्या प्रोजेक्टच्या ऑफर येत होत्या. त्यामुळे हे चित्रपट त्या सोडू शकत नव्हत्या आणि त्यांना संपूर्ण लक्ष बॉलिवूड चित्रपटांवरच केंद्रित करायचं होतं. त्यामुळेच श्रीदेवी यांनी 'जुरासिक पार्क'मध्ये काम करण्यास नकार दिला.


'जुरासिक पार्क' चित्रपटब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. चित्रपटाला बेस्ट साउंड आणि व्हिज्युयल इफेक्टसाठी ऑस्कर अवॉर्डही मिळाले होते.


चित्रपटात सॅम नील, जॅफ गोल्डब्लम आणि Richard Attenborough यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आतापर्यंत चित्रपटाचे चार भाग आले आहेत. यंदा जूनमध्ये चित्रपटाचा पाचवा भागही प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे.